मनातील स्पष्ट चित्र आणि योगायोग.
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा-पुणे
मनातील स्पष्ट चित्र आणि योगायोग.
जीवनातील काही माणसे आता व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी या तांत्रिक युगामध्ये योगायोगाने खरंच मिळत आहेत. या माणसांच्या माध्यमातून आपण काय घ्यावे हे आपण शिकले पाहिजे. कोणताही माणूस वाईट नसतो. पण त्याचे विचार त्याला वाईट कर्म करायला लावतात. जसे विचार तसे कर्म बाहेर पडते. योगायोगानं चांगल्या विचाराची व्यक्ती या माध्यमातून खरच मिळते. याचा मलाही प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. योगायोगाने मिळालेल्या या व्यक्तींचा आदर करावा. त्यांना आपल्या जीवनात स्थान द्यावे. त्यांच्याशी छान संबंध प्रस्थापित करावेत.
एखाद्याला फक्त आपली मैत्री हवी असते ती बोलण्यासाठी, कोणाला प्रेमाची भाषा बोलण्यासाठी, कोणाला मनातील दुःख कथन करण्यासाठी तर कोणाला आणखी कशासाठी. म्हणून अशा तंत्रयुगीन क्षेत्रातून मिळालेली मैत्री तपासूनच मग त्यात पुढे जावे. पण एखादा किंवा एखादी खरेचच खूप गोड असतो/ असते. आपले विचार आहे पटतात एकमेकांना. चांगल्या पवित्र विचारांची देवाण-घेवाणही केली जाते. मानसिक आधाराची गरज लागल्यास आपल्याला मानसिक आधारही दिला जातो. अशा योगायोगाने मिळणाऱ्या मैत्रीला खरच सलाम आहे. आणि हे मैत्री मात्र टिकवून ठेवावी. अशी माणसं एकमेकांच्या जीवनात येऊन एकमेकांच्या अंतरात घर करून बसतात. यालाच असं म्हणावं लागेल योगायोग नव्हे तर ही तर ईश्वरी देणगी आहे. आपले मन लागणारी व्यक्ती मिळाला तर त्यास सांभाळा. मन जपा, आनंदी ठेवा एकमेकांचा आदर करा.
कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला ध्येयाने व्यापून टाकले पाहिजे. ध्येयप्राप्तीच्या वेडाने माझे ध्येय प्राप्त होणारच हा विश्वास स्वतःवर ठाम हवा. शिल्पकार जेव्हा एखादी मूर्ती दगडात कोरून सुंदर बनवतो. किंवा पुतळा बनवतो तेव्हा त्याच्या डोक्यात काय चालू असते? शिल्पकाराने दगड फोडला, वरवरचा भाग काढला आणि मूर्ती घडली असे तर होत नाही ना! त्यासाठी शिल्पकाराच्या डोक्यामध्ये प्रथम ती मूर्ती तयार झालेली असते. पुतळ्याची आकृती तयार झालेली असते. आणि मग त्या दगडामध्ये आकार कोरलेला असतो तो बरोबर चालू भाग आहे तो भाग काढून टाकत असतो. याचाच अर्थ कोणतेही ध्येय निश्चित अथवा स्पष्ट असल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही.
यशाच्या शिखरावर चढायचं असेल, तर ध्येयाची पूर्ती मनापासून करावी लागते. जे ध्येय आहे त्याच्या चित्र मनात कोरले गेलेले असावेच लागते. आपले ध्येय प्रत्यक्षात येण्यापूर्वी आपल्या डोक्यात असायला हवे. त्यामुळे आपण आपल्या ध्येयपूर्तीसाठी कोणती कार्य करावी लागतात हे जाणून घेऊ शकतो. एक म्हण आहे “ध्येयाचा ध्यास लागला की कार्याची पूर्तता होते.” ही अगदी ‘परफेक्ट’ म्हण आहे, तर….
जीवनातील ध्येय निश्चित करा
ध्येयाला मनात कोरून टाका
वेड्यासारखे ध्येयाने झपाटून जा.
यश तुमच्याकडे आपोआप येईल.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा-पुणे
=========]



