
0
6
3
9
6
0
कविता ‘माझी’
शब्दभांडार साठले मनी
माळ तयांची गुंफिली झणी
ओळ एकेक रचली सुंदर
कविता सुचली अशी देखणी
ताल,सूर अन् लयीत बसली
गाता गाता भान हरपले
शब्द हृदयात घुमले ऐसे
अंतर्मन हे धन्य जाहले
सुखदुःखाच्या करिते बाता
कधी हसवते, कधी रडवते
कधी सावली बनते दीना
प्रेमाचे मग सिंचन करिते
आकाशाशी जुळवी नाते
कधी अंतरी डोही डुबते
कधी शिवारी भटकून येते
निसर्गाशी बंध जुळविते
कविता माझी गाता येते
यमक देखणे स्वरूप देते
ऐकून होई श्रवण तृप्त हे
भाव मनीचे साकारीते
श्रीमती सुलोचना लडवे
जिल्हा अमरावती
0
6
3
9
6
0



