गुरू म्हणजे काशी’, सारे तीर्थ तया पाशी’
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
‘गुरू म्हणजे काशी’, सारे तीर्थ तया पाशी’
गुरुचरणी असणारा आपला भाव हाच आपल्या उन्नतीला कारणीभूत ठरत असतो. मनाची आस्था गुरुचरणी ठेवावी, देहाची आस गुरुठायी असावी मनात गुरू नाम असावे आणि गुरुचे नाम घ्यायला वेळ काळ पहात बसायची गरज नाही. कधीही कोठेही नाव घेतले तरी चालते. गुरुला अंतःकरणाने आवाज दिलो की, लगेच आपल्याला तो दिशा दाखवतो फक्त आपला भाव निर्मळ असला पाहिजे. त्यात कोणताही स्वार्थ नको आहे.आधी गुरूशी वंदावे मग साधन साधावे गुरू म्हणजे मायबाप नाम घेता हरतील पाप. ‘गुरू म्हणजे आहे काशी’, सारे तीर्थ तया पाशी’. ‘तुका म्हणे ऐसे गुरू चरण तयाचे हृदयी धरू’.
सुख दुःखात मानसिक स्वास्थ्य जपणारे, मला भक्ती मार्गाला लावणारे, बोट धरून धार्मिक, अध्यात्मिक रस्ता दाखवणारे, स्व:ताला दु:खापलीकडे,सर्व सामान्य भक्तांच्या जीवनात आनंदाचे चांदणे फुलवणारे. छोट्या मोठ्या असा भेद भाव न करता सर्वाना जवळ करणारे सद्गुरू उज्वलानंद महाराज. गुरू तोच श्रेष्ठ समजावा ज्याच्या उपदेशामुळे आपले चारित्र्य सुधारते आणि मित्र तोच श्रेष्ठ समजावा ज्याच्या मुळे आपले जीवन आनंदी आणि रंगतदार होते.म्हणून गुरू सांगेल तेच एकावे तीच स्थिती सत्य दाखवू शकते. भक्तीचे आणि निष्ठचे प्रदर्शन मांडून काही साध्य होणार नाही, अहो जसा भाव तसा देव असतो मग गुरूमुखातुन आलेला शब्द सत्य करण्यासाठी आपला भाव सुद्धा तेवढा जागृत हवा, मनी भाव हवा गुरुच माझे तारणहार असून त्याचे नाम हेच हा भवसागर पार करेल.
संकट काळी मन शांत करून गुरू आदेश मानावा तो खरा साधक असेल. ज्याची निष्ठा डळमळीत झाली, त्याला लाभ होणार नाही. कारण, निराश मनाला परमेश्वर सुद्धा शक्ती देऊ शकत नाही. ज्याची घेण्याची ईच्छा संपून मन नकारात्मक होते तो संपून जाईल. म्हणून आपल्या अंतरी सद्विचार ठेवावे या भक्ती मार्गात गुरू निष्ठा हेच सर्वस्व आहे……!
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता. उमरगा जिल्हा धाराशिव



