Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखमहाराष्ट्र

डॉ. विजय कोकणे यांचे “समाजकार्य- एक कलात्मक कौशल्य शास्त्र” पुस्तकाचे जल्लोषात प्रकाशन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 0

डॉ. विजय कोकणे यांचे “समाजकार्य- एक कलात्मक कौशल्य शास्त्र” पुस्तकाचे जल्लोषात प्रकाशन

शास्त्रशुद्ध समाजकार्य विचार व वाचन संस्कृती वृद्धीसाठी डॉ. नितीन गांधी प्रकाशनाचा विशेष पुढाकार

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग: (दि ६) भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक व सुप्रसिद्ध कवी, लेखक व विश्लेषणकार डॉ. विजय हिरामण कोकणे ह्यांचे “समाजकार्य- एक कलात्मक कौशल्य शास्त्र” हे लेखक म्हणून सातव्या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार दिनांक 06 फेब्रुवारी 2026 रोजी “जन शिक्षण संस्थान रायगड” पर्यावरण पूरक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सहाण-अलिबाग येथे झाले. सदर पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नितीन बाळकृष्ण गांधी यांच्या प्रकाशनाच्या माध्यमातून करण्यात आलेले असून हे त्यांचे पाचवे प्रकाशन आहे.

समाजकार्य- एक कलात्मक कौशल्य शास्त्र ह्या पुस्तकाच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध समाजकार्य विचार व वाचन संस्कृती वृद्धीसाठी पुस्तक प्रकाशनासाठी विशेष पुढाकार त्यांनी घेतल्याचे मत डॉ. नितीन गांधी यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. तर राष्ट्र विकास व समाजकार्य जनजागृतीसाठी अशा मार्गदर्शक ग्रंथ व पुस्तकाची आवश्यकता असल्याचे मत “ह्यूमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेस” चे संचालक श्री हिरामण कोकणे यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

सकारात्मक समाजपरिवर्तनासाठी डॉ. विजय कोकणे यांनी केलेले लिखाण हे निश्चितच मोलाचे ठरेल असे मत बोर्ड मेंबर श्री. नरेनभाई जाधव व ॲड. नीला तुळपुळे यांनी व्यक्त केले.

डॉ विजय हिरामण कोकणे हे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगड योजनेचे विद्यमान संचालक असून सामाजिक कार्यकर्ते, विश्लेषणकार,लेखक, कवी, व चित्रकार म्हणून त्यांची आजपर्यंत, वेदांत, घोडदौड, वारली चित्रकला कलात्मक पुस्तिका, कॉलेज विश्व, प्रधानमंत्री सांसद आदर्श ग्राम योजना,मला कळलेले पी.एफ.एम.एस अशी 6 पुस्तके प्रकाशित आहेत. सदर दर्जेदार पुस्तकांच्या लेखन व “सकारात्मक समाजसेवि कार्य व कौशल्य विकास समाज प्रबोधन कार्याकरिता” त्यांना मानद डॉक्टरेट डि.लीट (HON. D. Litt) प्रदान करण्यात आली आहे यापूर्वी देखील त्यांना समाजकार्य, कौशल्य, ग्रामीण विकास, व महिला सक्षमीकरण इत्यादी विविध विषयांमध्ये एकूण 6 मानद डॉक्टरेट प्राप्त झाल्या असून विविध क्षेत्रात 7 आंतरराष्ट्रीय, 21 राष्ट्रीय, व 50 पेक्षाही अधिक राज्य, जिल्हा व स्थानिक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.

संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक डॉ. विजय कोकणे व व्यवस्थापक मंडळ, सदस्य श्री. नरेनभाई जाधव, ॲड. नीला तुळपुळे, सौ. गितांजली ओक, जेष्ठ लेखा परीक्षक श्री. संजय राऊत, सुप्रसिद्ध निवेदिका सौ. माधवी खेबूडकर, “ह्यूमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेस” चे संचालक श्री हिरामण कोकणे, वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आशा कोकणे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुमन कोकणे, कु. वेदांत कोकणे, धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानचे संचालक श्री. सचिन चव्हाण, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. उज्ज्वला चंदनशिव, माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ. राजाराम हुलवान, अँटी करप्शन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. रुपेश दांडेकर, श्री मुकुल खेबूडकर, श्री. पंडित ढमढेरे, श्री. अनिलकुमार बेल्हेकर, श्री. अरविंद कर्णिक, सौ. प्रिया कर्णिक, सौ. जयश्री ढमढेरे, श्री. विनायक देशपांडे, सौ. सुजाता देसाई, सौ. विद्या पाठारे, जन शिक्षण संस्थान रायगडच्या अकाउंट मॅनेजर सौ. प्रतिक्षा चव्हाण, सहायक कार्यक्रम अधिकारी सौ. कल्पना म्हात्रे व सौ. अक्षता जामकर तसेच कर्मचारी यांच्या मुख्य उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. सुप्रसिद्ध निवेदिका सौ. माधवी खेबूडकर यांनी कार्यक्रमाचे दर्जेदार सूत्रसंचालन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे