जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: सामाजिक बांधिलकी जपत रायगड फोटोग्राफर अँड व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि अलिबाग – मुरुड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील खानाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळी यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
अलिबाग – मुरुड मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, सचिव डॉ. अमित बेणकर, डॉ. समीर धाटावकर, डॉ. वसीम पेशमाम, डॉ. सुलतान हसवारे, डॉ. समीर बागडे, सुरेश कदम, डॉ. मनिष म्हात्रे, डॉ. अमोल ठाकूर, डॉ. ऋषिकेश झावरे, डॉ. पल्लवी शेळके यांनी विद्यार्थ्यांची कान, नाक, घसा, छाती, पोट, हृदयाचे ठोके, रक्त प्रमाण, दातांची तपासणी करून मोफत औषधं दिली. यावेळी शाळा समिती अध्यक्ष समीर भगत, रायगड फोटोग्राफर्स अॅड व्हिडीओग्राफर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष समीर मालोदे, शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र थळे, सह शिक्षक संतोष पालकर, सचिन कांबळे, मनीषा चुनेकर, वासंती काटले.
अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील, कार्याध्यक्ष सुदेश माळी, सल्लागार सुरेश खडपे, संतोष पाटील, सदस्य विजय पाटील, अमर मढवी, निलेश दुदम, विराज घरत, कल्याण संतोष पाटील .पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी ठेवून काम करीत आहे. या संस्थेमार्फत शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात.त्याचा फायदा ग्रामीण भागातील सर्वच स्तरातील घटकाला चांगल्या पध्दतीने होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून खानाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात एकूण 96 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशन च्या वतीने मोफत औषधं वाटप करण्यात आली.



