ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनचंद्रपूरविदर्भसाहित्यगंध
आयुष्याला द्यावे उत्तर
प्रतिमा नंदेश्वर ता.मूल, जि. चंद्रपूर

0
5
7
8
9
7
आयुष्याला द्यावे उत्तर
पडायच तरी उठायच
रडायच तरी हसायच
वाटा बंद दिसल्या तरी
नवा रस्ता शोधायच
आयुष्य विचारेल आपणास
थकला का रे? थांबला आहे
पण आपण सांगायच ठामपणे
नाही, अजून खूप लढायचं आहे
अपमानाचे दगड येतील
लागतील तुम्हा निंदेचे बाण
तरी अंधारातही चालायच
स्वप्नांची मशाल घेऊन
झाड पडतं पण बी रुजतं
रात गेल्यावर पहाट येते
अडचणी या पाहुण्यांसारख्या
येतात आणि निघूनही जातात
जीवनात कधीच न घाबरता
आयुष्याला द्यावे उत्तर
प्रत्येक जखमेतून शिकून
मात करावी आयुष्यावर
प्रतिमा नंदेश्वर
ता.मूल, जि. चंद्रपूर
0
5
7
8
9
7



