Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरभंडारा

भंडा-यात शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा, गडेगाव शाळेतील प्रकरण

भीमराव मेश्राम, प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

भंडा-यात शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा, गडेगाव शाळेतील प्रकरण

डॉ. विजया ठाकरे नंदुरकर जिल्हा भाजपा सचिव यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

भीमराव मेश्राम, प्रतिनिधी

भंडारा: तालुक्यातील गडेगावच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता २री च्या ९ ते १० विद्यार्थ्यांनी जांभूळ समजून शालेय परिसरातील वेलीवरील विषारी फळ खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना बुधवार (ता.४ सप्टेंबर) ला दुपारच्या सुमारास उघडकीस आली होती. या विषबाधित सर्व विद्यार्थ्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

युग सरोज नंदेश्वर, शिवम धीरज उईके, मंथन जितेंद्र शेंदरे, तन्मय प्रणित कुथे, स्नेहल लोकेश राउत, नेत्रा मोहन राउत, देवांशी प्रकाश नान्हे, प्राप्ती रुपेश बावणे, अवनी सुधीर उईके अशी विषबाधित विद्यार्थ्यांची नावे आहेत.

या घटनेबाबत माहिती होताच मुख्याध्यापक शरद भाजीपाले, सरपंच वर्षा रेहपाडे, शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्यांनी पालकांसह बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेले. घटनेची माहिती केंद्रप्रमुख गडेगाव तथा लाखनी पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे यांना देण्यात आली.

बाधित विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात प्रथ- मोपचार करून पुढील उपचारा साठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले. सर्व विद्यार्थी वार्ड क्रमांक १२ मध्ये भरती असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या घटनेने पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शालेय प्रशासन घटना कशी घडली? याचा शोध घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच भाजपा जि ल्हा सचिव डॉ. विजया ठाकरे नंदुरकर यांनी सामान्य रुग्णालय भंडारा येथेभेट दिली व मुलांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीविषयी कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक देवचंद सोयाम यांचेशी चर्चा केली.

चर्चे दरम्यान ६ विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात येणार असून ३ विद्यार्थ्यांना निरिक्षणार्थ ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी संजय सावरकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन कुथे, सामाजिक कार्यकर्ता उके, मुख्याध्यापक शरद भाजीपाले, सहाय्यक शिक्षक मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. रुग्णालयात जाऊन विषबाधित विद्यार्थ्यांना भेट दिल्याबद्दल डॉ. विजया ठाकरे नंदुरकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे