ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध
कावळ्यांची शाळा
विमल धर्माधिकारी पाचवड तालुका वाई,सातारा
0
4
8
2
8
6
कावळ्यांची शाळा
काव काव करीत
कावळे झाले गोळा
बाभळीच्या झाडावर
कावळ्यांची शाळा .
नको खडू नको फळा
गाऊ गोड गाणी
आज फक्त पाठ करू
नव्या नव्या म्हणी.
गुरुजींनी सुरू केला
अभ्यासाचा धडा
वाचला मग त्यानी
काळया रंगाचा पाढा .
रंग नाही रूप नाही
कावळा काळा काळा
काळया फळ्यावर फुलतो
ज्ञानाचा मळा.
बाळ काही जेवेना
चिऊ काऊ येरे
बाळा संगे तूप रोटी
खाऊन जा रे .
विमल धर्माधिकारी
पाचवड तालुका वाई,सातारा
======
0
4
8
2
8
6



