
0
5
4
7
4
5
ओळखीचा गाव
दूर दूर सोडून जात होतो
आठवणींचा पाट होता
विसरली कशी नाही ठाव
तोच तर होताओळखीचा गाव||
वरात थांबली गावच्या मंदिरात
सून आली लक्ष्मीच्या पावलात
जीवनाची झाली नवी सुरुवात
तोच तर होता ओळखीचा गाव||
सासूसासरे नणंद भाच्यांचा कुटुंब
सासुरवाशीण सदैव कामात धुंद
चुलीला फुंकर डोळ्यात धुर
तोच तर होता ओळखीचा गाव ||
खेळ मांडला हसत्या संसाराचा
नियतीने जिंकला सुडाचा डाव
राजा सोडून गेला आपलाच गाव
तोच तर होता ओळखीचा गाव||
चालता चालता जरा थबकलो
पिंपळाच्या सावलीत विसावलो
मन बोलले कर्मभुमी हेच ते गाव
तोच तर होता ओळखीचा गाव||
रंजना राहुल ब्राह्मणकर
अर्जुनी/मो, जि.गोंदिया
========
0
5
4
7
4
5



