
0
4
8
2
9
0
ती…
विसरू नकोस ती आहे म्हणून तू आहेस,
विचार केला तर,विजय आणि सन्मान तुझाच आहे’…
नाही केला तर ‘दुर्भाग्य फक्त तिच्याच नशिबी आहे.’…
जागा आहेस फक्त जागाच राहा,
तुझ्या या मर्दानी बाण्याच्या ज्योतीने तिच्या मार्गात फक्त तेवत राहा…
झाशीचे बळ आणि जिजाऊची माया तिच्यात….
ज्ञानाची ज्योत सावित्रीची अन भरारी कल्पनेची आहे तिच्यात…
विसरू नको, सोबत कायम तिचीच आहे कित्येक रूपात..
विजय पताका मिरवत राहशील सदैव दिमाखात..
संजय दत्तात्रय लव्हे
असई / महाराष्ट्र पोलीस, पुणे
=========
0
4
8
2
9
0



