Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनधाराशिवनागपूरपरीक्षण लेखमराठवाडासाहित्यगंध

भारत विद्यालय, बेडगा येथील गणेशोत्सवाचे महत्त्व

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर ता उमरगा जिल्हा धाराशिव

0 4 8 2 9 4

भारत विद्यालय, बेडगा येथील गणेशोत्सवाचे महत्त्व

प्रिय उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद, व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपल्या भारतभूमीत गणेशोत्सवाला विशेष स्थान आहे. ज्ञान, बुद्धी, विवेक व संस्कार देणारे श्री गणपती बाप्पा हे खऱ्या अर्थाने विद्यार्थीप्रिय देवता आहेत. म्हणूनच शालेय जीवनात गणेशोत्सवाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. आपल्या भारत विद्यालय, बेडगा येथे हा गणेशोत्सव गेली बावीस वर्षे अत्यंत उत्साहाने व सातत्याने साजरा केला जात आहे. हा उपक्रम केवळ धार्मिक स्वरूपाचा नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरतो.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेत अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये –
विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारी व्याख्यानमाला
ज्ञानाचा विस्तार करणारी सामान्य ज्ञान परीक्षा
सृजनशीलतेला वाव देणारी रांगोळी स्पर्धा
लेखनकौशल्य वाढवणारी निबंध स्पर्धा
भाषाशुद्धतेवर भर देणारी शुद्धलेखन स्पर्धा

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्पर्धात्मक वृत्ती, आत्मविश्वास, संस्कार आणि सामाजिक जाणीव विकसित होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलेले भारत शिक्षण संस्थेचे संचालक तसेच भारत विद्यालय बेडगा शाखेचे अध्यक्ष आदरणीय ‘भानुदासराव बापू माने’ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. आर. एल. चौव्हाण साहेब यांच्या काटेकोर नियोजनामुळे व शिक्षकांच्या सक्रिय सहभागामुळे गेली बावीस वर्षे हा उत्सव शैक्षणिक व सांस्कृतिक रंगतदार सोहळा ठरत आहे.

एकंदरीत, आमच्या विद्यालयातील गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव न राहता ज्ञानाचा, संस्कारांचा आणि संस्कृतीचा महोत्सव ठरला आहे. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचे चारित्र्य, विचारसरणी व व्यक्तिमत्त्व अधिकाधिक बहरत जाते. “गणपती बाप्पा मोरया”..!!

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे