‘आभार सुमनांजली’; मृदुला कांबळे
सौ.मृदुला कांबळे गोरेगाव रायगड

‘आभार सुमनांजली’; मृदुला कांबळे
दादांचा संदेश बघून
मनी बहर आनंदाचा..
लेखणीला उर्जा देणारा
हा सोहळा सम्मानाचा..
सकाळी संदेश वाचला आणि लगेच फोटो पाठवून दिला. अगदी अप्रतिम अनुभव असतो हा….! परीक्षेच्या निकालाची जशी उत्सुकता असायची तसंच काहीसं दादांचा संदेश पाहिला की वाटते..! खरंतर दादांचा संदेश म्हणजे आम्हां शिलेदारांसाठी आनंद आणि उत्साहाची गुरूकिल्लीच.
कालच्या चारोळीचा विषय जरा गंमतीशीर पण लिखाणाला अवघड असा मला वाटतं होता.. कोलांटउडी ह्याविषयी विचार करताना मला फक्त राजकारणी नजरे समोर दिसत होते किंवा डोंबारी जो खेळ करतं असतो..पण त्यावर काही चारोळी जमेना. बदलती राजकीय परिस्थिती,सत्तेचा हव्यासा पायी नेत्यांचा कोलांटउड्या….अमुक पार्टीचा नेता म्हणून जनतेनी निवडून दिलेला नेता मंत्री होण्यासाठी दलबदल करतो आणि त्यांच्या ह्या कोलांटउड्या सामान्य जनता शांतपणे बघतं असते. पण वेळ आल्यावर त्या नेत्यांना मतांची ताकत दाखवून देते.
लोकशाहीचा अर्थ नेते विसरू शकतात. सामान्य सुशिक्षित जनता नाही. पण ह्या गोष्टीचा ही खुर्चीपायी त्यांना विसर पडतो….ही लोकशाहीसाठी शोकांतिकाच आहे…मी दोन चारोळ्या केल्या. एक चारोळी मात्र मी अगदी वेळेवर टाकली..पण काय आश्चर्य नेमकी तीच चारोळी परीक्षकांच्या पसंतीस पडली आणि सर्वोत्कृष्ट ठरली.
माझ्या चारोळीला सर्वोत्कृष्ट स्थानी विराजमान करून गौरविण्यात आल्याबद्दल…समुहाचे सर्वेसर्वा आ.राहुल दादा, आ.पल्लवीताई, आ.सविताताई,आ. वैशालीताई, आ. तारकाताई आ.स्वातीताई, आ. वृंदाताई आ. शर्मिलाताई, आ. विष्णु दादा ,आ. संग्राम दादा, आ. हंसराज दादा आणि प्रशासकीय टीमचे मन:पुर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद. तसेच सर्व शिलेदार बंधु भगिनींचेही मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद
सौ.मृदुला कांबळे गोरेगाव रायगड
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह



