0
4
8
3
0
0
तुझ्या सोबत नव्याने जगायचे होते
घेऊन हाती हात तारूण्याची साथ
साता समुद्रापार जायचे होते
तुझ्या सोबत नव्याने जगायचे होते
आणली असती शोधून फुले चाफ्याची
पिकलेल्या केसांत माळायचे होते
तुझ्यासोबत नव्याने जगायचे होते
नको म्हणत असतांना रिमझिम पावसात
ओंजळ भरून गारा वेचायचे होते
तुझ्यासोबत नव्याने जगायचे होते
धुक्यात दाटलेल्या वाटेवरून
पडली असती पाय घसरून
तुला पाहुन सावरायचे होते
तुझ्यासोबत नव्याने जगायचे
आयुष्य दररोज लहान होत असतांना
भावनांना मोकळे सोडायचे होते
तुझ्यासोबत नव्याने जगायचे होते
सविता धमगाये,नागपूर
0
4
8
3
0
0



