खा. अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमाला लोकांनी फिरवली पाठ, नापास खासदाराच्या यादीत भर
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
खा. अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमाला लोकांनी फिरवली पाठ, नापास खासदाराच्या यादीत भर
गर्दी जमवण्यासाठी आयोजकांनी लहान मुलांना बसवलं खुर्च्यांवर
मुलांना बसविण्यासाठी पालकांना पैसे दिल्याचे उघडकीस
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड: मराठवाड्याचे वैभव असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला. सुरुवातीला चव्हाण यांच्या सोबत भाजपामध्ये काही जण आले.परंतु लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला.आणि अशोक चव्हाण यांच्या जवळचे अनेक जण चव्हाणांची साथ सोडून काँग्रेस पक्षात गेले.चव्हाणांचे कार्यकर्ते साथ सोडत आहेत. आता नागरिक देखील चव्हाणांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.
नांदेडच्या मुदखेड येथे विविध विकास कामांच्या भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी मंडप आणि खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या.परंतु या मंडपात टाकण्यात आलेल्या खुर्च्यां रिकाम्या होत्या. लोकांनी अशोक चव्हाण ‘ नापास खासदार’ यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. आयोजकांनी गर्दी जमवण्यासाठी लहान मुलांना या रिकाम्या खुर्च्यांवर आणून बसवलं.सध्या या कार्यक्रमाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
या कार्यक्रमाची अखेर या लहान मुलांनी शोभा वाढवली असच म्हणावं लागेल .काही महिलांनी तर आमच्या नगरात कुठल्याच सुविधा नाहीत असा सूर या कार्यक्रमात काढला.त्यामुळे आयोजकांनी अशोक चव्हाण यांच्या समोर मोठी पंचायत झाली. मुलांना आणा आणि ‘हवे ते पैसे घ्या’ या ऐकिवातावर पैसे घेऊन पालकांनी मुलांनी पाठवल्याची चर्चा आहे.



