➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*????संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा????*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट बारा????????????*
*????स्पर्धेचा विषय : भिजली माती????*
*????मंगळवार : १० /सप्टेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*भिजली माती*
पाऊस आला
सर सर सर
भिजू चला रे
भर भर भर…
पावसाची सर
भूईवर पडली
कोरडी माती
खुदकन हसली…
ओला पाऊस
घेऊन हाती
चिंब चिंब ही
भिजली माती…
हिरवे हिरवे कोंब
उगवले चौफेर
पाऊस पाण्याने
वाहून गेला केर…
ओल्या मातीवर
हिरवी हिरवी शाल
केसांशी खेळते
चंचल हवा थंडगार…
भिजलेल्या मातीचे
सोहळे कित्ती फार
मऊ मऊ मातीला
देऊ कल्पक आकार…
*सौ.आशा कोवे- गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????️⛈️????️♾️♾️♾️♾️
*भिजली माती*
आला आला वारा
देई हळूच इशारा
सांगे आवरा पसारा
सुरु होतीलच धारा
आल्या आल्या धारा
चिंब शिवार सारा
सारी भिजली माती
काय लागेल रे हाती
नक्षी काढतील पक्षी
मातीत कीटकभक्षी
माती आली तरारून
ऊर आलाय रे भरून
चला खेळू चिखलात
चिखल आणू परसात
पावसाची ही रिपरिप
जसे अश्रू रे टिपटीप
हातपाय नका गाळू
चला चिखलात खेळू
मस्त भिजली रे माती
चिखल घेऊ रे हाती
मातीशी जोडून नाळ
भक्तीने वाजवू रे टाळ
येईल सुखाचा रे काळ
फाटलं नाही रे आभाळ
फाटलं नाही रे आभाळ
*श्री.संग्राम कुमठेकर*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????️⛈️????️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*भिजली माती*
आला काळोख दाटून
मन भितीने गोठून
हाक येई ही कोठून
चला आता घरी परतून
सोडा सोडा खेळभांडी
वारा घालतो कुभांडी
होईल उचलबांगडी
नको आता लंगडी
आला वारा अवचित
झाले मग मी विचलित
छुळ आला तो उडवत
सोबत सुगंध दरवळत
सखे कशाचा हा वास
सुगंधीत झाले श्वास
वारा घेतो सोबतीस
धारा ही सखी खास
जोडी अवतरली भुवरती
शहारली मग ही धरती
भेटीला यांच्या आतुरती
मिलनात भिजली माती
मैत्रीची ही सुखद गाणी
सृष्टीस देईल दानापाणी
मनी सुगंध दरवळ आणि
सौख्याची अभंग कहाणी
*प्रा. अर्चना कृष्णराव सुदामे*
*छत्रपती संभाजीनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????️⛈️????️♾️♾️♾️♾️
*भिजली माती*
पाऊस आला
सर सर सर
घरी पळा रे
भर भर भर
चिखल ओला
घसरगुंडी झाली
पळता पळता
मजाच आली
भिजली झाडे
भिजले प्रांगण
चमचम चमकती
थेंबांनी अंगण
भिजली माती
ओलीचिंब
पाण्यात दिसले
प्रतिबिंब
पाहता पाहता
रोवले पाय
चिखलात फसलो
निघतील काय
एक पाय निघता
दुसरा फसे
मजा पाहून
आवरेना हसे
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????️⛈️????️♾️♾️♾️♾️
*भिजली माती*
पाऊस लहरी
भिजली माती
सरीवर सरी
चिखलमाती
मारली उडी
अंग भरले
खोड्या काढी
भान हरपले
भिजली माती
आता वास नाही
दलदल झाली
पुरे म्हणती
गमती जमती
मित्रांसोबत
डबके भरती
तुडुंब वाहत.
ओल्या मातीत
पायाचे ठसे
वाट काढीत
टाकीत उसासे.
*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????️⛈️????️♾️♾️♾️♾️
*भिजली माती*
सरीवर सरी, येता अंगणी
भिजली माती ,चिंब धरणी।।धृ।।
भिजली धरा,सारी माती
गंध मातीचा पसरला
परिमल मनी दरवळला
खेळ खेळु माती माती।।१।।
सरसर पाऊस आला
माती चिंब भिजून गेला
रानशिवारात धोधो बरसला
काळया मातीत अंकुर फुटला।।२।।
भिजली माती, उगले मोती
शेत डोलते, हिरवे हिरवे
रान झाले, बरवे बरवे
मातीत रमले, मन माझे।।३।।
ओलीचिंब माती ,मातीचे गोळे
बनवा खेळणे ,मातीत खेळे
सरीवर सरी, येता अंगणी
भिजली माती ,चिंब धरणी।।४।।
*श्री गणेश नरोत्तम पाटील*
*ता.शहादा,जि.नंदूरबार*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????️⛈️????️♾️♾️♾️♾️
*भिजली माती*
पाऊस आला
सर सर सर
भिजली माती
चर चर चर
अंगणात झाला
चिखल सारा
कागदी नाव
सो सो वारा
वारा सुटला
पाने हलली
गवत पातेही
नाचू लागली
नदी नाल्याना
आला पूर
राहा सगळे
सावध दूर
ओल्या मातीची
बनवू गोळे
आकार देऊ
वेगवेगळे
या रे सारे खेळू या
आनंदाने नाचू या
पावसाचे गीत
मजेत गाऊ या
*सुनंदा किरसान*
*अर्जुनी मोर गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????️⛈️????️♾️♾️♾️♾️
*भिजली माती*
भिजली माती
केला राडा
तुडवली माती
अडकला पाय वाकडा ॥१॥
आला बंट्टी
रांगडा गडी
केली गट्टी
मारली उडी ॥२॥
केली कडी
करून कल्ला
जुंपली जोडी
झाला हल्लागुल्ला ॥३॥
चढले शिडी
गाठली माडी
केली उतरंड
फोडली दहीहंडी ॥४॥
भिजली माती
माखले अंग
लोळले मातीत
मती झाली गुंग ॥५॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????️⛈️????️♾️♾️♾️♾️
*भिजली माती*
धो धो पाऊस आला
क्षणात भिजली माती
हवाहवासा वाटणारा सुगंध
मातीचा, पसरला सभोवती
आल्या सरी पावसाच्या
मुले पावसात खेळू लागली
टपोऱ्या गाराही पडल्या
ओंजळीत मुले झेलू लागली
भेगाळलेली भिजली माती
शेतकरी पेरणी करून घेई
घाम गाळून शेतामध्ये
कष्टाची भाकर तो खाई
पहिल्या पावसाचा बघा
आनंद किती आहे न्यारा
हिरवाईन नटला निसर्ग
आता सुखावली धरा
चला चला मुलांनो आपण
प्रत्येकाने एक झाड लावू
वृक्षारोपणाचे महत्त्व सांगू
संवर्धन करून झाडे जगवू
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????️⛈️????️♾️♾️♾️♾️
*भिजली माती*
भिजली माती छान छान
आनंदाला आले उधान
गोळे वळवले मातीचे
पोट झाले गणपतीचे
मातीची एक सुरळी केली
चेहऱ्यावर मस्त सोंड जुळली
दोन्ही बाजूला मोठे कान
गोळ्यावर जोडली मान
बाप्पा बसले पाटावर
मोदक ठेवला हातावर
उंदीर महाराज बसवले बाजूला
बाप्पाची सेवा करायला
डोळे लागले लुकू लुकू
मुकुट लागले बाप्पाचे चमकू
*सौ.शशी मदनकर ,ब्रम्हपुरी*
*जिल्हा _चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????️⛈️????️♾️♾️♾️♾️
*भिजली माती*
धो धो बरसल्या पाऊससरी
अनंत हर्ष दाटला उरी
भिजली माती भिजले रान
बालचमूंची मज्जाच न्यारी.
ए आई आई मला शाळेत
जायची गं आहे घाई
छत्री माझी घेऊन आधीच
निघाली ही लबाड ताई.
पावसात चिमुकले शाळेत
रान शिवारातून येती जाती
कपडे माखतच अनवाणी
चिखलातून वाट तुडवती.
भर पावसातही घरापेक्षा
ओढ आगळीवेगळी शाळेची
कागदाच्या होड्या बनवून
मजा पाण्यात सोडण्याची.
मध्येच ऐकू येतेय कानी
बेडुकरावांची डराव डराव
शाळेतच खरा वसलाय
चिमुकल्यांचा प्रेमाचा गाव.
पाऊस ओसरल्यावर बनवी
भिजल्या मातीची खेळणी
उत्साह ओसंडून वाहे मनी
सप्तरंगाची उधळण जीवनी.
*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️????️⛈️????️♾️♾️♾️♾️
*भिजली माती*
सुटला थंडगार वारा
झाडे वेली सुखावली,
पावसाच्या,एका थेंबाने
धरतीमाय शहारली.
अंगोपांगी भिजली माती
नख शिखान्त हर्षली,
जें हवे ते मिळाले
आतुरतेने वाट पाहिली.
दरवळला, सुगंध
बेधुंद झाले मन,
रानमाळ झाले हिरवेगार
आनंदी झाले जीवन.
शोधले मित्रासंगे
हुंदडलो मी सारीकडे
नाही मला गावले
सुख आनंदाचे कडे.
जमा करू माती
करू नवनव्या आकृती,
आकार देवू त्यास
युग आले नवनिर्मिती.
खुणावती मला
बोलक्या भिंती
मदतीला धावली
काळी माती.
*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????️⛈️????️♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.????*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन /मुख्य प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖



