‘अण्णाभाऊ साठे’ यांच्या जीवनातील हे होते क्रांतिसिंह बनण्याचे पाहिले पाऊल
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विशेष
‘अण्णाभाऊ साठे’ यांच्या जीवनातील हे होते क्रांतिसिंह बनण्याचे पाहिले पाऊल
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विशेष
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० मध्ये महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यात झाला. अण्णाभाऊ साठे यांचे खरे नाव “तुकाराम भाऊराव साठे ” असे होते. अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांचे नाव “भाऊराव साठे ” होते ,तर त्यांच्या आईचे नाव “वालुबाई साठे” होते.
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला होता ,त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना समाजातील काही लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्याकाळी समाजातील काही माणसे दलीत समाजाला कमी लेखत होती आणि त्याकाळची माणसे दलीत समाजातील माणसांना स्पर्श देखील करत न्हवती. अण्णाभाऊ साठे यांना देखील समाजातील या लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्याकाळी होत असलेल्या जातीय भेदभाव मुळे अण्णाभाऊ साठे यांना आपले शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही. अण्णाभाऊ साठे हे लहानणापासूनच विठ्ठल भक्त होते. विठ्ठलाची भक्ती करण्यामध्ये त्यांचे मन रमत असत.
अण्णाभाऊ साठे यांचे लोकशाहीर बनन्यासाठीचे पाहिले पाऊल
अण्णाभाऊ साठे यांचे वडील भाऊराव साठे हे नोकरीच्या शोधात मुंबई येथे आले होते. भाऊराव साठे सोबत अण्णाभाऊ साठे हे देखील मुंबई येथे आले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या नातेवाईकांपैकी बापू साठे नावाचे नातेवाईक हे एक तमाशा मंडळी चालवत होते. अण्णाभाऊ साठे यांना अगोदर पासून गाणे गाण्याचा छंद होता , जेव्हा बापू साठे यांना समजले की अण्णाभाऊ साठे यांना गाणे गाण्याचा छंद आहे ,तेव्हा त्यांनी अण्णाभाऊ साठे यांना आपल्या भजनी मंडळी मध्ये शामिल होण्यासाठी विनंती केली. अण्णाभाऊ साठे यांनी विनंती ला मान राखून ते बापू साठे यांच्या भजनी मंडळीमध्ये शामिल झाले.
असाच एकदा एका गावामध्ये तमाशा चा फड रंगणार होता. त्यादिवशी त्या गावामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील हे भाषण देण्यासाठी आले होते आणि त्यांनी त्या तमाशा वेळी भाषण दिले होते ,ज्या भाषणातून अण्णाभाऊ साठे यांचा कलेकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. क्रांतिसिंह नाना पाटील हे त्या भाषणामध्ये “ब्रिटिश भारतीय लोकांवर करत असलेल्या अन्याया विषयी बोलत होते”. ते पुढे भाषणामध्ये भारतातील कामगार आणि मजदुर लोकांवर होत असलेल्या अन्याया विषयी बोलले होते.
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेल्या भाषणाने संपूर्ण प्रेक्षकांचे मन खेचले. अण्णाभाऊ साठे यांना देखील वाटले की ,”कला ही फक्त लोकांचे मनोरंजन करण्यासाठी नाही तर , कलेच्या माध्यमातून आपण समाजामध्ये जन जागृती देखील करू शकतो”. याच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भाषणामुळे अण्णाभाऊ साठे यांचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि हा प्रसंग म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील क्रांतिसिंह बनण्याचे पाहिले पाऊल होते.
संपादक



