Breaking
ई-पेपरकवितानागपूरपरभणीपरीक्षण लेखमराठवाडाविदर्भसाहित्यगंध

दोन शब्द कृतज्ञतेचे, मराठीचे शिलेदार समूहाप्रतीचे; बी एस गायकवाड

बी एस गायकवाड पालम परभणी सदस्य मराठीचे शिलेदार समूह

0 4 8 2 8 4

दोन शब्द कृतज्ञतेचे, मराठीचे शिलेदार समूहाप्रतीचे; बी एस गायकवाड

आज सकाळी सकाळी ६: ५२ वा. मोबाईल उघडताच राहुल दादांचा सुखद धक्का देणारा मॅसेज ‘तुमचा फोटो पाठवा’. क्षणाचाही विलंब न लावता लगेचच फोटो पाठवला. आणि प्रतिक्षेत आतुरता लागून राहिली,नेमकी वर्णी कुठे लागते की. मध्ये मध्येच समुहात डोकावत होतो. आणि ठीक ९:१४ वा. कविता समूहात माझे कवितेचे सर्वोत्कृष्ट रचनेचे पोस्टर झळकले. पाहून मनोमन हर्ष झाला.अपेक्षा होती एकतर कविता किंवा बालकाव्य असायला हवे. ती पुर्ण झाली.कारण ‘चिरीमिरी’ हा विषय येताच कार्यालयात काम होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी द्यावी लागणारी लाच (चिरीमिरी).त्यामुळे हताश झालेला माणूस,आणि त्याला आलेली चीड काव्यातून व्यक्त केली.

शक्य तो रचनेतून वास्तव ,परखड मांडण्याचा माझा सदोदित प्रयत्न राहिलेला आहे.याच आशयाची ही रचना परिक्षकास भावली. आणि आजची सर्वोत्कृष्ट रचना म्हणून माझ्या रचनेस सन्मानित करण्यात आले.माझ्या रचनेस सन्मानित केल्याबद्दल समूहाचे आधारवड, सर्वेसर्वा, मुख्य प्रशासक आदरणीय राहुल दादा, सचिव आदरणीय पल्लवीताई पाटील,मुख्य परीक्षक आ.सविताताई , सहपरीक्षक आ. स्वातीताई, आ. तारकाताई, आ. शर्मिलाताई. आ. प्रतीमाताई, आ. वृंदाताई, आदरणीय प्रशांत दादा, संग्राम दादा, विष्णू दादा, अशोक लांडगे सर, अरविंद उरकुडे सर, व सर्व परीक्षक, संकलक,सहप्रशासक टीम चे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद देतो.

तसेच माझ्या रचनेस प्रेरक प्रतिक्रिया व अभिनंदनीय शुभेच्छा देऊन लिखाणास प्रोत्साहित करणाऱ्या व लिखाणाचे बळ वाढवणाऱ्या समूहातील सर्व ताई दादांना मनःपूर्वक धन्यवाद देऊन सदैव तुम्हां सर्वांच्या ऋणाईत राहणे पसंत करतो. मागील स्पर्धेच्या सप्ताहात ही सोमवार ते बुधवार माझ्या त्रिवेणी, बालकाव्य आणि बुधवारीय काव्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रचनेत स्थान देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. निवडणूक मीटिंग व निवडणूक ड्युटी यामुळे गुरुवार, शुक्रवार व शनिवार ईच्छा असूनही कामाच्या व्यापात, व्यस्ततेमुळे लिहू शकलो नाही. याचीही खंत मनात वाटत होती. आणि आज रचना सर्वोत्कृष्ट ठरल्यामुळे हायसे वाटले. समूहाने भरभरून दिले आहे. याच समूहात वारंवार सन्मानित झालो आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. अशीच कौतुकाची थाप सदैव पाठीशी राहील.या अपेक्षेसह पुनश्च एकदा आपल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देऊन लांबलेला शब्दप्रपंच थांबवतो.

बी एस गायकवाड
पालम परभणी
सदस्य मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे