अलिबागई-पेपरकविताकोकणनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
कधीतरी पावसात भिजव
सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे
0
4
8
2
9
7
कधीतरी पावसात भिजव
कधीतरी पावसात धुंद व्हावं
सरी सोबत चिंब भिजाव
अवखळ वाऱ्याला मिठीत घ्याव
पावसाच्या सरींचे चुंबन द्याव
पावसात भिजलेल्या तृणातून चालावं
वर मान करून आकाशाला बोलावं
तुडूंब भरलेल्या नदीसारखं वाहत जाव
खळबळ मंजूळ आवाजावर भाळाव
लपलेल्या सूर्याला उगाच चिडवावं
काळाकुट्ट ढगांना सूर्यास आडवलेल पहाव
गवताने पावसाच्या पाण्यात नाहव
नागव्या पायाने गवतावरून चालावं
डोळे मिटून कानावर हात ठेवाव
लख्ख विजेचा कडकडाट ऐकावं
आणि लखलखाट पाहून थक्क व्हाव
आईच्या कुशीत जाऊन लपाव
नदीत चढणीचे मासे पकडाव
पांढरीशुभ्र फेसाळलेले झरे पहाव
लाटांचे गूज ऐकण्यास समुद्रावर जाव
हळूच पाण्यात पाय सोडून बसावं
मनावरचा ताण विसरण्यासाठी निसर्गात जाव
सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे
श्रीवर्धन जि. रायगड
0
4
8
2
9
7



