Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजीनगरमराठवाडासाहित्यगंध

अधोगती

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 6 0 4 9 7

अधोगती

चंद्र, मंगळ कवेत घेतले
विज्ञानाने केलीय प्रगती
मात्र अजूनही भूकबळी
ही प्रगती की अधोगती?..//

विश्वच बेचिराख होईल
अशी हातात अणू शक्ती
प्रकांड बुद्धिवादी मानवा
ही प्रगती की अधोगती?..//

स्वामीत्व हवे सृष्टीचे पर
मुळीच नसे सेवक वृत्ती
जडली युद्धखोर विकृती
ही प्रगती की अधोगती?.. //

निसर्ग नियमात हस्तक्षेप
अती चांडाळ झाली नीती
आत्मअंशावरच दंश मारी
ही प्रगती की अधोगती?… //

एक पृथ्वी एकच जमीन
विभागली ती नाना रिती
लालसेची ना होई तृप्ती
ही प्रगती की अधोगती?..//

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे