Breaking
कवितापरभणीसाहित्यगंध

निघाले बाप्पा

मनोज परसराम शिंदे ता.पालम, जिल्हा परभणी

0 6 5 0 7 2

निघाले बाप्पा

पहिल्या दिवशी आगमन झाले,
दारात सजली सुंदर रांगोळी,
गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने,
दुमदुमली ही गल्लीबोळ.

हातात पूजेची थाळी घेऊन,
केला उत्साहाने नवस-जाप,
नयनांत साठवून रूप तुझे,
आज निघाले बाप्पा.

दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी रंगला,
आरती अन् मोदकांचा थाट,
सकाळ-संध्याकाळ भक्तांची,
घरात लागली सुंदर वाट.

चौथ्या-पाचव्या दिवशी गौरी आल्या,
घर झाले अधिकच पावन,
साऱ्यांच्याच मनी भरले होते,
भक्तीचे गोड श्रावण.

सहाव्या-सातव्या दिवशी गुंजले,
अभंग अन् भजनांचे सूर,
आठव्या-नवव्या दिवशी लागली,
विरहाची चाहूल आतून दूर.

दहा दिवसांचा हा सोहळा,
कसा संपला कळालेच नाही,
तुझ्या प्रेमाविना आता देवा,
मनात काहीच उरले नाही.

मनोज परसराम शिंदे
ता.पालम, जिल्हा परभणी
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 5 0 7 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे