*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*
*🥀विषय : रंग वसंताचे🥀*
*🍂बुधवार : १२/ मार्च /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*रंग वसंताचे*
रंग वसंताचे सारे, लावूनी रंगीत व्हावे।
या सुंदर जीवनाचे, सुरेल संगीत व्हावे।।
आनंद हर्ष दाटला, दिशात या चोहीकडे।
नाचून गाऊन मनी, आता प्रफुल्लित व्हावे।।
वसंताचा हा सोहळा, हासत हासत आला।
दुःख व्यथा विसरूनी,आपण हर्षित व्हावे।।
नाजूक फाद्यांना आले, हिरवे रंग दुल्हारे।
कोकीळेचा कंठ होऊ,तिचे धुंद गीत व्हावे।।
गळून गेली पाने ती, नाही भीती वादळाची।
नव्या उमेदीने पुन्हा, ईथे पल्लवित व्हावे।।
निळी पिवळी केशरी, बहरुन फुले आली।
झुळझुळ वा-यासंगे,अता सुगंधित व्हावे।।
निसर्गा रुप गोजीरे, सुंदर तुझे भाव झाले।
गुंतून जीव जीवात, आम्ही प्रेमगीत व्हावे।।
*श्री गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
ऋतुराज वसंतात
बहरले नवचैतन्य
प्रतिक उत्कर्षाचे
वातावरण प्रसन्न
फुटली झाडांना पालवी
झाला निसर्ग हिरवागार
वसंतपंचमी पासून
वसंतोत्सवाची बहार
हिरवा रंग जीवनदायी
आहे विकासाचे प्रतिक
नविनता येई सृष्टीला
मनभावन छटा वासंतिक
उमलती फुले विवीध
पिवळी,केसरी,गुलाबी
शुद्धता,शांतीचे दर्शक
पांढरी फुले मना भावती
मिळे उर्जा तनमनास
पळसाचा रंग केसरी
रंग वसंताचे जीवनात
आणतात नवी उभारी
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
रंग न्यारे
लेऊन सारे
मजेत डोले
वसंत दुलारे …१
रंगीबेरंगी
बहरली फुले
फांदीफांदी
निसर्ग झुले…२
धुंदित सारे
मोर नाचरे
कुहूकुहू बोले
कोकीळ प्यारे….३
वसंताचे सोहळे
धरावर सजले
मोहरांचे तुरे
फांदीवर डवरले…४
झुळझुळ वारे
सुगंधित झाले
फुटली धुमारे
पळस फुले…५
निळी पिवळी
लाल केशरी
वसंतोत्सवाची झळाळी
देई मनास उभारी…६
रंग वसंताचे
मनास भुलवी
नवं चैतन्याचे
उधळण करी…7
*श्री पैठणकर सर नाशिक*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
ऋतूराज तू
चैतन्य प्रितीचे
होते पूजन
काम देवतेचे
यौवनात तू
बहर निसर्गाचा
सण प्रथम येतो
वसंत पंचमीचा
निमित्त तू
उत्तरायणाचे
कृतार्थपण त्या
उर्जादायी रवीचे
थंडीस उतार
मुहूर्त रथसप्तमीचे
उधळून चौफेर घोडे
आगमण बहराचे
नवपल्लवीत आशा
दर्शन नवपालवीचे
होते दहन मग
इथे होलीकेचे
होता मदनपुजा
खुलने सौंदर्याचे
निसर्ग नटवी धरेस
ताटवे पुष्पलतीकांचे
होते मिलन
प्रेम प्रेमिकांचे
फुललेले प्रेम जणू
राधा कृष्णाचे
रंगपंचमीत नहाती
गाती गीत उत्साहाचे
उधळीत तन मनावर
येती रंग वसंताचे
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
रंग वसंताचे नभी खुलता
होईल अगाध किमया
शाल मखमाली थंडीची
निमाली क्षणभर लिलया
प्रसन्न सारे वातावरण
अवखळ उनाड वारा
आनंदी आनंद चौफेर
सुखावली ही वसुंधरा
आला ऋतुराज वसंत
घेऊन बदल काही नवे
झाडाझुडपांत बागडती
प्रसन्नतेने पक्ष्यांचे थवे
नवी पालवी,रसदार फळे
तरू वृक्षांवर डुलती
मोहक फुलांचे ताटवे
जणू तोरणहार झुलती
कोकीळचे मधुर सुर हे
मनास मोहिनी घाली
विविध रंगी फुलपाखरे
भिरभिरती भोवताली
सण होळीचा आनंदाचा
घेऊन येतो नवी पर्वणी
दुःखावर सुखाचा विजय
होत असतो क्षणोक्षणी
सुंदर,सुखद,बहारदार
विलोभनीय रंग वसंताचे
शांती सुखाचा आशिष
हेच वरदान निसर्गाचे
*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १६२ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*रंग वसंताचे*
पंचम स्वर नभात भरले
आला सुगंध भान हरपले
आम्रतरूवर मोहर फुले
भ्रमर गुंजारव सुरात चाले
पवन बावरा होत कावरा
भिरभिर एकटाच फिरे
उंच उडवित पाला पाचोळा
सांगे सोबती घ्या मला रे
निबीड रान कसे अचानक
लाल केशरी रंगात न्हाले
तांबट कोकीळ बुलबुल सारे
पंख पसरीत तरुवर आले
कुठे भांडण कुठे लळा
वसुंधरेचा रंग आगळा
गंध मातीचा घेऊन फिरतो
वात होतो गंधात बावळा
रंग वसंताचे चहुकडे
प्रितीचा ऋतू भुरळ पडे
उडे आकाशी गुलाल गुलाबी
हृदयी प्रणयाचा बंध जडे
*सविता धमगाये, नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
पाने गळलेत आणि,
झाली रूक्ष वृक्षवल्ली…
वसंताच्या चाहुलीने,
बहरले वृक्ष हल्ली…१
ऋतुराज वसंत हा,
बहरतो चैतन्यात…
उत्कर्षाच्या भावनेने,
होई प्रसन्न क्षणात…२
फुटे पालवी कोवळी,
होई सोनेरी निसर्ग…
पळसाची लाल फुले,
रंगे रंगात संदर्भ…३
होता हिरवी सृष्टी ही,
मनी पाखरांचा थवा…
नव्या युगाचा प्रारंभ,
जाई छळूनिया नवा…४
नानाविध रंग फुले,
टाकी मोहून सर्वस्व…
मानवाच्या देहालागी,
सारे आपुलेच विश्व…५
नवी उभारी संचारे,
साऱ्या प्राणीमात्रा अंगी…
*”सुधाकरा”* रंगत जा,
*”रंग वंसतांचे”* रंगी…६
*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
रणरणत्या उन्हात ही फुलायचे
सांगून जातात नाना रंग फुलांचे
कठीण परिस्थितीवर मात करत
उधळण करताहेत रंग वसंताचे
शिकावे त्या पळस फुलाकडून
ताठ मानेने उभे दिसावे शोभून
केसरी फुले रंग त्यागाचे प्रतीक
मानवा सांगे घे मजकडून शिकून
गुलमोहर फुलतो अंगप्रत्यांगाने
लाल रंग सांगतो क्रांतीचे प्रतीक
जीवनात बदल हवा योग्य वेळी
सांगतोय जणू मानवाचे भाकीत
कडुलिंब फांदीला शुभ्र फुलोरा
रखरखत्या उन्हात दिसतो फुलून
शांती,समृद्धी असावी जिवनात
फुलोरा,पानातून जातोय सांगून
रंग हिरवा,भगवा,निळा,पिवळा
होई रंगपंचमीला उधळण रंगाची
सर्व रंगात रंग मिसळून जातील
सांगा पिचकारी कोणती कुणाची
रंगपंचमीच्या रंगात निसर्गाकडून
मानसा तुला शिकवण भरभरुन
रंगाच्या चौकटीतून बाहेर पडून
निघावं मानवतेच्या रंगात न्हाऊन
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
मधुगंधी मधुमासाच्या
इथे तिथे या चाहुली
रंग वसंताचे लेऊनी
पुलकित धरा रंगली
गंधभरी सुखद अशी
वात लहर ही आली
क्षितीजासी ओठंगुनी
आभा पूर्वेच्या गं गाली
वसंत राजा अवतरे
नाद कोकिळे भरला
पुष्पसाज लेऊनिया
पर्णसंभार सजला
सृजनाचीआस अशी
ठायी ठायी जागलेली
खग विहगा अंतरात
मीलनाच्या या चाहुली
मदभऱ्या मधुमासी हा
वासंतिक रंग सोहळा
गंधभरे रंग उधळूनी
वसंत किती नादावला
कमलिनी धुंद फुंद
मकरंद हा उधळीत
अवतीभवती फिरे
भृंग मदहोश मत्त
गंधित या वसंत रंगी
सखे रंगून तू ये ना
राधिके तुझ्या मिठीत
एकरूप हा कान्हा
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
पानगळीचा दाह देत, ओसरला शिशिर कहर
रंग वसंताचे उधळत, आता पसरला चैत्रबहर.//
कटू वेदनादायी जखमांचा, बदलू लागला नूर
निघू लागला गोड हळवा,सुख संवेदनांचा सूर.//
जीर्ण खोडाच्या रंध्रातून, फुटे कोवळा अंकूर
हिरव्या पर्ण पालवीचा, मोहवी सुगंध मधूर..//
उदासीनतेची कात टाकून, केला साज शृंगार
लतावेली,झाडा झुडपात, नवचैतन्याचा हूंकार.//
कुहू कुहू कोकिळेचा, निनादला मंजुळ स्वर
पाखरांचा गोड गुंजारव, गुणगुणती वेडे भ्रमर.//
अगणित सुमनजातींचा, अंथरला सडा सुंदर
मंतरला आसमंत सर्व, रंग,मकरंद,गंध अत्तर.//
मनभावन मनप्रसन्न, सृष्टीचा रम्य अविष्कार
होईल का मानवा तुला, सृजनाचा साक्षात्कार.//
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
फाल्गुन , चैत्र , वैशाखात
दडले अस्तित्व वसंताचे
मनोहर दर्शन चैत्रात दिसते
उधळत येई रंग वसंताचे ॥
गहिरा गुलाबी रंग उधळीत
झळाळतो उन्हात पिंपळ
मधुमालतीची नविन पालवी
तांबुस गुलाबी भर लावण्यात॥
रंगबिरंगी साज लेऊनी
फूलते घाणेरी राजस्थानात
कडूनिंबाला निळसर तुरे
न्हाते रात्र सुगंधात ॥
नाजुक , सुंदर , निळीजांभळी
फूलते कळी करंजाची
कडवट उग्र गंध शिंपडत
टोपी डोईवर पांढऱ्या रंगाची ॥
पौष सरता मोहरला आंबा
खाव्यात चैत्रात कच्याच कैऱ्या
हिरवे कोके घेऊन अंगाखांदयावर
फुलाविना फळतो फणस झुबकेदार ॥
रूपरसगंधाने बहरती
आनंददायी रंग वसंताचे
सृजनाचा सोहळा चालतसे
वसंतात्मा रूप चैत्राचे ॥
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
लोभस रंग वसंताचे
बघा भूवरी पसरले
नव्या पालवी संगे
निसर्ग यौवन फुलले
विविध फुलांच्या रंगी
सृष्टी वाटे लावण्यवती
वसंताच्या स्वागतास
पाखरे नवे गीत गाती
नवजात बालकास
माय भरवी घास
जणू वसंत ऋतू देई
सृष्टीला नवा श्वास
जीवास देई चेतना
आम्रवृक्षाचा मोहर
उन्हाच्या वेदनांवर
गार वाऱ्याची फुंकर
घेऊन येतो उत्सवाची
नि सौंदर्याची उधळण
वसंताच्या प्रेम रंगात
भिजून जाऊ सर्वजण
*कुशल गो डरंगे, अमरावती*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
रंग वसंताचे निसर्गासवे
मनीं माझ्या खुलू लागले..
नवं चैतन्याच्या हिरवळीने
मन माझे मोहरून आले…
दाह विरहाचा सोसून झाला
ओसाड वाळवंट झालाय गार..
ओयासीस मनीच पाझरला
तहान तृष्णेची तो भागविणार..
कस्तुरी मृगास जाणीव झाली
दरवळ सुखाचा माझ्याच आत..
कोकिळेसंग गाऊ लागले
कधी नव्हे ते मधुर सुरात…
नवपालवी वसंतास फुटली
निसर्ग बहरू लागला नवा..
भिरभिर पक्षांची पाहून
मज का वाटू लागला हेवा…
रंग वसंताचे उधळत जावे
कळेना काय घडलेय आज…
रंगीबेरंगी फुलांची दरवळ,की
श्वासांवरही चढलाय साज…
दर्पणात मी न्याहाळता
म्हणाला,पडलेय तुझ्याच प्रेमात तू…
रंग वसंताचा असो की प्रेमाचा
बहरत राहावी ही सृष्टी अन तू…!
बहरत रहावी ही सृष्टी अन तू..!
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
या काळ्या मायभूमीने
तारीले जग हे हातावरी
निर्मियले सजीव सृष्टी
अंकुश ठेविले विश्वावरी…
ढेकळाचे रान तापले
फुलून झाले काळेभोर
ऊन वा-याच्या झळा
पिंगा घालती म्होर…
नव चेतकाची नवलाई
कानी येत नसे गुंजगाई
कसा फुटतो कंठ मृगा
रान ओलचिंब जव्हा होई…
जसं कातळ निघे भूईचे
पानगळती ही झाडाची
रंग हिरवा पान पानाचा
नवी कोर माळ बांगड्याची…
राना रानात फुलला
लालेलाल रंग पळस
झुबके ऐटीत डोलत
माना उंच करी पळत…
बहरुन आले फुले
डोलत फुलं फुलांचे
आदबीने जपूया
उधळी रंग वसंताचे…
*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
माघ शुद्ध पंचमीला
प्रसन्नतेची लागे चाहूल…
वैदिक काळी निर्मिला जो
येत आहे तोच वसंत…..।।
उच्च राशी मीन आणि मेष
प्रथमतः असतो सूर्य मध्यात
अवनी घेते उर्वरा शक्ती….
उत्साह पसरतो सगळ्यांवरती.. ।।
कोकीळ करतो कुहूकुहू अन्
वनराईत नाचतो मोर……..
आंबा, जांभूळ, चिंच, बोरं….
गहू डोलतो…..शेतांवर…..।।
धरणी धारीते पितांबर…..
झुलतात बालक झाडांवर…
गीतेमध्ये कृष्ण सांगतो….
मी तर आहे ऋतूराज वसंत….।।
रंगबिरंगी रंगांची व्हावी उधळनं
दुःख ,कष्ट ,रोग.. जावेत हरूनं
जीवन फुलावं वसंतासम…..
आनंद झुल्यातं झुलावं अंतरंग.. ।।
*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖





