
0
3
4
5
9
0
अक्षरयात्रा
नवख्यांच्या प्रवेशोत्सवाने
उघडती ज्ञानमंदिराची दारे,
कावऱ्याबावऱ्या नजरांचे
सोहळे स्वागतांचे साजरे…!!१!!
आम्ही शिक्षणाचे वारकरी
किलबिलाट चिमुकल्यांचा,
ज्ञानवंत घडवण्या त्यांना
ध्यास दिनरात प्रयत्नांचा…!!२!!
शाळा हेची देऊळ आमुचे
सानुले आमचे वारकरी,
गजर होतो जेंव्हा घंटीचा
चित्त न लागे त्यांचे घरी…!!३!!
खडू आणि फळा आम्हां
असे जणू टाळ नि मृदंग,
बडबडगीत नि कवितांमध्ये
दिसती आम्हा हो अभंग…!!४!!
ध्यान असू दे आम्हांवरती
आमुची ज्ञानाची ही जत्रा,
आकारण्या संस्कारी नागरिक
चालली ही अखंड ‘अक्षरयात्रा’..!!५!!
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जि.नांदेड
========
0
3
4
5
9
0