कवितानागपूरभंडारामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
त्या शितलहरी वनिता गभणे आसगाव भंडारा
0
4
8
2
9
3
त्या’ शितलहरी
उबदार वसनात जरी
देह आज गुंडाळलेला
परी,’त्या’ शितलहरींचा
स्पर्श मनावर रेंगाळणारा
ना वसनाची जाण तया
ना आवरण कुठले देहाला
आदिवासी जमात जंगली
जगणे फक्त उदरभरणाला
येताच हिवाळी शितलहरी
मग शेकोटीचा असे सहारा
अवतीभवती शेकोटीच्या
नीज चक्षूतील देई पहारा
अशा वेळी चालत आली
तिथे एक प्रकाशवाट
कष्टप्रद अशा जगण्याला
लाभली माया ममतेची भेट
पशुतुल्य जीवन तयाचे
माणसात हो आज आले
मंदा नि प्रकाश आमटे
देवदूत हो तयाचे झाले
वनिता गभणे
आसगाव भंडारा
======
0
4
8
2
9
3



