भाजपा डिगडोह मंडळाच्या उपाध्यक्षपदी कमलेश खोब्रागडे
तालुका प्रतिनिधी, हिंगणा
भाजपा डिगडोह मंडळाच्या उपाध्यक्षपदी कमलेश खोब्रागडे
तालुका प्रतिनिधी, हिंगणा
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
हिंगणा : भारतीय जनता पार्टी डिगडोह मंडळाच्या उपाध्यक्षपदी कमलेश खोब्रागडे यांची निवड करण्यात आली आहे. हिंगणा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणारा एक सामान्य कार्यकर्ता व अमरनगर सारख्या छोट्याशा परिसरात राहणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपा डिगडोह मंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून त्यांना पक्ष संघटनेत काम करण्याची संधी व एक मोठी जबाबदारी पक्षाने दिली व ही दिलेली जबाबदारी ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मानस कमलेश खोब्रागडे यांनी दाखविलेला आहे.
नागपूर ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीवजी पोद्दार व अरविंदजी गजभिये यांच्या कार्यकाळात सलग दोनदा युवा मोर्चा डिगडोह मंडळ महामंत्री व उपाध्यक्ष पद भूषवणाऱ्या व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष मा.आ.सुधाकर जी कोहळे यांच्या कार्यकाळात ओबीसी आघाडी डिगडोह मंडळ अध्यक्ष म्हणून डिगडोह मंडळाची धुरा सांभाळणारे व ओबीसी आघाडीत कार्य करणारे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे कमलेश खोब्रागडे यांच्या कार्याची दखल घेत भाजपा नागपूर ग्रामीणचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे भाजपा नागपूर ग्रामीण चे अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली व भाजप डिगडोह मंडळाचे अध्यक्ष महेश लोखंडे यांच्या हस्ते, महामंत्री अनिल शर्मा, प्रवेश भाबडा, चंद्रशेखर राऊत आणि श्री लव सिंग, नागपूर जि प च्या माजी जिल्हाध्यक्षा संध्या गोतमारे, डिगडोह चे माझी जि प सदस्य अंबादासजी ऊके यांच्या उपस्थितीत त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कमलेश खोब्रागडे यांची वर्णी भाजपा डिगडोह मंडळ उपाध्यक्षपदी लावण्यात आली या निवडीमुळे निलडोह ,डिगडोह , परिसरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कमलेश खोब्रागडे यांना नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षवाढीसाठी कटिबद्ध व प्रामाणिकपणे समाजकार्य करून नागरिकांची सेवा करण्यासाठी मी नेहमी तत्पर राहील आणि सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका बजावण्यासाठी ते सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.





