
0
5
1
6
5
1
स्वागत नववर्षाचे
चैत्र मासारंभ होता
हिरवळ ल्याली वृक्षांनी
मकरंद शोषता शोषता
केला गुंजारव पक्षांनी
खांदी मळून वृषभाचे
चाले लगबग पोशिंद्याची
कसण्या काळी भूमाता
शेतशिवारात मुहुर्ताची
मराठीमनाचा गुढीपाडवा
वाहती चैतन्याचे वारे
कैरी कडुलिंबाचे पन्हे
चाखती आनंदाने सारे
स्वागत नववर्षाचे करताना
नव्या स्वप्नांचे बांधू तोरण
असावा पोशिंदा केंद्रस्थानी
ठरावे त्याच्या हिताचे धोरण
संकल्प मनात धरुन
करु स्वागत नववर्षाचे
आत्मविश्वासाच्या बळावर
पाहू जीवना दिन हर्षाचे
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड, जिल्हा नांदेड
0
5
1
6
5
1



