Breaking
ई-पेपरकविताखानदेशसाहित्यगंध

तुझ्या प्रेमात…

श्रीमती सीमादेवी बेडसे चाळीसगाव जि.जळगाव

0 5 9 0 3 4

तुझ्या प्रेमात…

तुला पाहिलं त्या क्षणी,वेळ जणू थांबून गेला,
माझ्या शांत मनामध्ये,प्रेमाचा दीप उजळला..

तुझ्या नजरेच्या स्पर्शाने,हृदय अलगद फुललं,
न कळत माझं जग सगळं,तुझ्याभोवतीच फिरलं..

तुझं हसणं म्हणजे जणू,चांदण्यांची बरसात,
तुझ्या सहवासात मिळते,मनाला सुखाची साथ..

हातात हात तुझा असावा,एवढीच छोटी आस,
प्रत्येक श्वासात तुझं नाव,प्रत्येक धडधडीत तुझा भास..

प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही,ती मनांची ओढ असते,
दोन जीवांना एक करणारी,सुंदर अशी गाठ असते..

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,तू सोबत असाच असावा,
माझ्या प्रत्येक आनंदात,तुझ्या प्रेमाचा बहर यावा..

श्रीमती सीमादेवी बेडसे
चाळीसगाव जि.जळगाव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 0 3 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे