
0
4
0
8
9
1
फुटलेले ढग
रोज रोज बरसून
कंटाळा कां येत नाही
सांग ना रे पावसा
विश्रांती कां घेत नाही..
फुटलेले ढग बघ
भळाभळा कोसळतात
सांग ना रे पावसा
कोणाशी ते लढतात
जिकडे तिकडे भरले
नदी नाल्यात पाणी
सांग ना रे पावसा
कडाडून वीज कशाला गाते गाणी
पाण्याचे तळे माझ्या
शाळेभोवती साचले
सांग ना रे पावसा
अंकांचे पाढे तू नाही कां वाचले
परत जातो सांगूनही
पुन्हा माघारी फिरलास
सांग ना रे पावसा
कां जीवावर बेतलास
डॉ.सौ.मंजूषा साखरकर
ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर
0
4
0
8
9
1





