
0
4
0
8
9
1
चिखल
पावसाळ्यात आला पाऊस
अंगावर पडे ओली ओस
शिंपडला सारा मातीवर
धावू लागलो चिखलावर!!१!!
लहान लहान पावलांचे ठसे
चिखलात उमटले कसे नुसे
पाऊस पडता डबके झाले
बघा पायाची बोटं रंगले !!२!!
मातीची केली खेळणी सारी
कधी वाडगा, कधी पळी सुरी
खेळताना मिळतो आनंद
चिखलात चालतो प्रत्येक छंद!!३!!
आई ओरडे कपडे मळले
तीच्या डोळ्याचे इशारे कळले
चिखलात मिळतो गारवा फार
डोक्यावर पडे पाण्याची धार !!४!!
चिखल सांगतो पावसाची गोष्ट
थेंबाची असते किमया मस्त
बाल गोपाळाचे चहरे हसरे
खेळण्यात सारे अभ्यास विसरे!!५!!
सुरेखा चित्ते कांबळे
श्रीवर्धन जि. रायगड
0
4
0
8
9
1





