0
4
8
2
9
7
तुझेच धम्मचक्र हे…
अन्याय अत्याचार अंधश्रद्धेने
मांडला होता उच्छाद सारा
झाला वाटाड्या भीम माझा
दिला त्यांनी विद्रोहाचा नारा
चवदार तळ्याचे जल प्राशून
केलीस क्रांती समानतेची
नाकारुन अमानवीय परंपरा
घेतलीस दीक्षा बौद्ध धम्माची
करुणेच्या आर्त याचनेने
दिले मानवास ‘मी’ पण
भीमा तुझेच धम्मचक्र हे
ठरले आम्हा प्रगतीचे कारण
मुक्या जीवांची होऊन वाणी
व्यक्त होण्यास दिलीस प्रेरणा
जखडलेल्या साखळदंडातून
सोडवलेस आम्हा अनुयायांना
भीमा तुझेच धम्मचक्र हे
ठरली उपासकांची नवसंजीवनी
शिका संघटीत व्हा करा संघर्ष
मूलमंत्र आमच्या आहे ध्यानी
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जि.नांदेड
0
4
8
2
9
7



