गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*🌤️विषय : शेवटचे शब्द🌤️*
*🔹गुरूवार : ०५ / ०३ /२०२६*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*📗कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध २०८ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे..*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*शेवटचे शब्द*
*स्वाभिमानी छावा शिवबांचा*
*ना झुकला ना तो वाकला*
*शेवटचे शब्द असे गरजले*
*पातशाहीचा थरकाप उडाला*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🔰🚩➿➿➿➿
*शेवटचे शब्द*
यातनांनी छिन्नविच्छिन्न झाला देह जरी
तरी स्वराज्यासाठी मन नाही निशब्द
मरेपर्यंत वाकणार नाही हा मराठी बाणा
हेच आहेत माझे शेवटचे शब्द
*सौ अर्चना जगदिश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🔰🚩➿➿➿➿
*शेवटचे शब्द*
शेवटचे शब्द उच्चारले मरणदारी
आणि माता पिता ही गहिवरले
कौतुक केले विर शंभू राजाचे
कृत्य कृत्य जीवन तयांचे जहाले
*बी एस गायकवाड*
*पालम परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🔰🚩➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*शेवटचे शब्द*
“देहाचे जरी झाले तुकडे
धर्म माझा सोडणार नाही”
शंभूराजाचे शेवटचे शब्द हे
धर्मस्वाभिमानीची देते ग्वाही
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🔰🚩➿➿➿➿
*शेवटचे शब्द*
*अभिनानाचे,गौरवाचे,शेवटचे *शब्द,*
*होती त्यात,सहानुभूती अपार…,*
*शेवटच्या श्वासापर्यंत,फक्त स्वराज्य,*
*नव्हता दुसरा,कोणताही विचार…!*
*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*©️सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🚩🔰🚩➿➿➿➿
*शेवटचे शब्द*
स्वराज्यास प्राणाचे तोरण बांधले
“मुजरा आबासाहेब”, शंभू बोलले
शेवटचे शब्द, पवित्र ते जाहले
स्वराज्याचे छत्र काळाने हरवले
*सौ समीक्षा हळबे*
*डोंबिवली (पूर्व) जिल्हा ठाणे*
*©सदस्य: मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🔰🚩➿➿➿➿
*शेवटचे शब्द*
मुखात कुठे जिव्हा होती
होतेच कुठे शेवटचे शब्द
वेदनेतही अभिमान होता
शौर्य हृदयात अन् भाव निशब्द
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*सहप्रशासक मुख्यपरीक्षक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🔰🚩➿➿➿➿
*शेवटचे शब्द*
क्रूर वेदना साहिल्या, वाहिले रक्तांचे पाट,
जिव्हा छाटली तरी उमटला ‘जगदंब’ शब्द दाट.
मृत्यूचाही झाला थाट असे सिंहासारखे शूर राजे,
मराठ्यांच्या इतिहासात अजरामर शंभुराजे
*सौ.अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🔰🚩➿➿➿➿
*शेवटचे शब्द*
मरेन पण झुकणार नाही
हेच असतील शेवटचे शब्द
वज्रनिर्धारी संभाजी समोर
मृत्यूही झाला असेल स्तब्ध..
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🔰🚩➿➿➿➿
*शेवटचे शब्द*
शंभू महाराज्यांना आठवले
शब्द छ. शिवाजी महाराजांचे
स्वराज्यासाठी आहुती दिली
शंभर तुकडे संभाजी राज्यांचे
*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🚩🔰🚩➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



