
0
4
8
2
8
4
जिजाऊ हवी होती
पातशाहीच्या थैमानात
रयत होरपळत होती
नव्हता कुणी वाली येथे
चालेना कुणाचीच मती
निपजला पुत्र शिवनेरी
जिजाऊंच्या कुशीतून
सुसंस्कारासवे युद्धनीती
राजमातेच्या मुशीतून
परस्त्री ही मातेसमान
शिकवण देणारी जिजाई
जशी खाण तशीच माती
घडे गोष्ट ही अपुर्वाई
राजं पुन्हा जन्माला या
हाक ऐकून सुन्न होते मती
ते भूवर अवतरण्यासाठी
अगोदर जिजाऊ हवी होती
आला पुण्याला होईल निर्वंश
सनातन्यांनी घातली भीती
अंधश्रद्धेला लाथाडले तशी
आज जिजाऊ हवी होती
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
0
4
8
2
8
4



