Breaking
कवितादेश-विदेशनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

वैष्णवांचा मेळा; नीला पाटणकर

0 4 8 2 9 7

वैष्णवांचा मेळा

वैष्णवांचा मेळा । जमला पंढरी ।
उभा विटेवरी । पांडुरंग ॥१॥
चिपळ्या मृदुंग । टाळ तालावर ।
नामाचा गजर । माऊलीचा ॥२॥

विश्वाचा भार l झेलतो श्रीहरी ।
संकटात तारी । भक्तगणां ॥३॥
चंद्रभागा काठी । मिळे समाधान ।
भक्तीत तल्लीन । वारकरी ॥४॥

विठ्ठल मायाळु । भक्तांवरी जीव ।
मनी नसे हाव । विठुराया ॥५॥
अंतरात वास । वसे चराचरी ।
पंढरीची वारी । अंतरात्मा ॥६॥

भक्ता मनी राही । विठ्ठल अखंड ।
नाही कधी खंड । हृदयात ॥७॥
स्वरूप भाबड । शांती मना देई ।
गुणगाण गाई । भक्तकरी ॥८॥

माऊली दर्शना । येती सारे गण ।
तोच त्यांचा सण l विठुवारी ॥९॥
भक्तीरस मनी । भक्तीचिया कास ।
लागलिया आस । भक्तांचिया ॥१०॥

वैष्णवांचा मेळा । तया दारी गोळा ।
विठुहरी भोळा । मनोमनी ॥११॥

श्रीमती नीला पाटणकर,शिकागो
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे