Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

किल्ले भिमाशंकर

सौ. स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे

0 4 8 2 9 3

किल्ले भिमाशंकर

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले ‘भिमाशंकर’ वसले आहे. सहावे ज्योतिर्लिंग असलेले हे भगवान शंकराचे धार्मिक स्थळ आहे. याच ठिकाणी पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी भीमा नदीचा उगम होतो. सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत घनदाट जंगलांनी वेढलेले हे ठिकाण १९८४ मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले गेले. विविध प्रकारचे प्राणी व विविध पक्षी येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून हा परिसर सजवला आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेली शेकरू खार याच अभयारण्यात आढळते‌. याशिवाय सांबर, ढेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या हे प्राणीदेखील आढळतात. बिबट्यांच्या संवर्धनासाठीदेखील शासन येथे विविध उपाययोजना अवलंबते. वैशिष्ट्यपूर्ण अभयारण्य व तीर्थक्षेत्र यामुळे पुणे जिल्ह्यातील हे एक प्रमुख पर्यटनस्थळ झाले आहे.

भिमाशंकर मंदिराची रचना हेमाडपंथी पद्धतीची आहे. हे मंदिर सुमारे १२००-१४०० वर्षीपूर्वीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरावर दशावताराच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडपाबाहेर मोठी लोखंडी घंटा आहे. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. सभामंडपाशेजारी लोखंडी खांब लावून दर्शन रांगा केल्या आहेत. याशिवाय येथे पहायला मिळते ते गुप्त भिमाशंकर. भीमा नदीचा मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु तेथून ती गुप्त होते व पूर्वेस दीड किमी अंतरावर प्रवाही होते असे मानतात व या जागेस गुप्त भिमाशंकर म्हणतात. भीमा नदीचा उगम पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.

भिमाशंकर मंदिराजवळ पश्चिमेला कोकणकडा आहे. याची उंची सुमारे ११०० मीटर आहे. येथून अतिशय मनोहारी दृश्य दिसते. स्वच्छ प्रकाश असेल तर अरबी समुद्राचेही दर्शन होते. कोकणकड्यापासून एक रस्ता सीतारामबाबा आश्रमाकडे जातो व तेथून नागफणीला जायला वाट आहे. हे अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर आहे. कोकणातून याचा आकार नागाच्या फण्याप्रमाणे दिसतो. निसर्गाच्या सान्निध्यात विविध वनस्पती, प्राणी, पक्षी पाहत धार्मिक वातावरणाचीही अनुभूती देणारे हे प्रेक्षणीय स्थळ नक्कीच पहायला हवे.

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे