कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
चितपट; वृंदा करमरकर
0
4
8
3
0
0
चितपट
आव्हानांच्या छाताडावर
पाय रोवून भिडत रहा
अपमानाचे जहर पिऊनी
ताठ करण्याने जगत रहा
संकटांनी केले चितपट
तरी न डरता लढत रहा
राखेतून ही फिनिक्स होऊन
पुन्हा जन्मूनी हसत रहा
जीवन डाव दोन घडीचा
हार जितीची पर्वा कसली?
खूणगाठ बांध मनाशी
उन्हा नंतर येते सावली
रहाटगाडगे सुखदुःखाचे
अखंडपणे फिरत राहते
विवेकाची साथ धर, मन
सुखदु:खे समत्व मानते
प्रेमाची नित करूनी शिंपण
नात्यांतील जप बंध रेशमी
समाधानाच्या धाग्यांनी वीण
जीवन वस्त्र हे गर्भरेशमी
सत्याची तू कास धरावी
क्षण क्षण उत्सव व्हावा
आनंदाने जीवन जगता
आनंदाचा तरू बहरावा
वृंदा(चित्रा)करमरकर,सांगली
==============
0
4
8
3
0
0



