0
4
8
2
9
7
ठिगळ
मृगाच्या पावसाने धनी, जातो आनंदून।
पेरणीची करे घाई ,सारं शेत नांगरून।
रोज भल्यासकाळी उठून ,शेतात जातो।
दुपारी दोघेजन मिळून शिदोरी खातो।
लिंबाची सावली आहे, आम्हा मायेचा पदर।
वामकुक्षी निवांत होतो थोडं लेटून अधर।।
उन्हातान्हात रोज ,घाम गाळतो वावरी।
स्वप्न पाहून उद्याचे,मीही होते बावरी।।
हाशीखुशीने पेरणी निंदन खुरपणी होते।
पण हंगामात गत मागचीच धाऊन येते।।
पिकते तेव्हा पिकांना ,भावच देत नाही।
चांगला भाव असताना पिकच येत नाही।।
संसाराचा गाढा आमचा असाच आहे सुरू।
आभाळ कोसळता वाटे जीवाच काय करू।।
काबाडकष्ट करून ,नेसते लुगडं फाटलं।
धन्याच्या धोतरास पुन्हा ठिगळ लागलं।।
गोठ्यातून गाय बैलंही , गहीवरुन पाहतो।
आम्ही हळूच अश्रूंना, डोळ्यातच झाकतो।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा
=======
0
4
8
2
9
7



