Breaking
ई-पेपरकवितानागपूरपरभणीमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

अधोगती

बी एस गायकवाड

0 4 8 2 9 0

अधोगती

प्रत्येकजण जबाबदार
ज्याची त्याची मनोवृत्ती
त्यातूनच ठरे मार्गक्रमण
प्रगती होते की अधोगती…१

वर्तन आपले कारणीभूत
मिळेल फलीत ते कर्माचे
उगाच खापर फोडू नको
दुज्याचे शिरी अपयशाचे…२

विचारपूर्वक व्हावे वर्तन
मूळ शोधून योग्य कारण
कारणमीमांसा करतांना
चिकित्सक आत्मचिंतन…३

भान ठेवून परिस्थितीचे
प्रतिकुलतेत अनुकूलता
निर्माण करायचे सोडून
उगाच नशीबा दोष देता…४

साधावा तो मोका बाका
संधीचे सोने करण्याचा
आलेख चढता प्रगतीचा
विचार नको अधोगतीचा…५

बी एस गायकवाड
पालम,परभणी
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे