ई-पेपरकविताधाराशिवमराठवाडासाहित्यगंध
मोबाईल
डॉ ज्ञानेश्वर गुरलिंगप्पा माशाळकर बेडगा ता उमरगा जिल्हा धाराशिव
0
4
8
2
8
6
मोबाईल
खूप काही खाल्लं आहे या मोबाइलनं…
याने हाताचं घड्याळ खाल्लं,
याने टॉर्च-लाईट खाल्ला,
याने चिठ्ठ्या–पत्रे खाल्ली,
पुस्तक खाल्लं,
रेडिओ खाल्ला,
टेपरेकॉर्डर खाल्ला,
कॅमेरा खाल्ला,
कॅल्क्युलेटर खाल्लं.
याने मैत्री खाल्ली,
भेटीगाठी खाल्ल्या,
आपलं सुख-समाधान खाल्लं,
आपला अमूल्य वेळ खाल्ला,
पैसे खाल्ले,
नाती खाल्ली,
आठवणी खाल्ल्या,
आरोग्य खाल्लं.
याने संवाद खाल्ला,
डोळ्यांत डोळे घालून बोलणं खाल्लं,
घरातला हसरा आवाज खाल्ला,
आई-वडिलांचं बोलणं खाल्लं.
याने खेळाचं मैदान खाल्लं,
मुलांचं बालपण खाल्लं,
वाचनाची सवय खाल्ली,
विचारांची खोली खाल्ली.
याने संयम खाल्ला,
शांतता खाल्ली,
रात्रीची झोप खाल्ली,
सकाळची ताजेपणा खाल्ली.
याने प्रश्न विचारायची सवय खाल्ली,
स्वतः विचार करण्याची ताकद खाल्ली.
डॉ ज्ञानेश्वर गुरलिंगप्पा माशाळकर
बेडगा ता उमरगा जिल्हा धाराशिव
0
4
8
2
8
6



