0
4
8
2
9
0
सर्वस्व तूच
सर्वस्व तूच माझे
जीवनाचा ध्यास
जगण्याची आस तू
अंतरीचा श्वास
जीवनाची काटेरी वाट
त्यात तुझा आधार
हसत पार होईल
वाट दुःखाची पार
तुझ्या प्रेमळ वाणीने
निघून जाई शीण
तुझ्याच कुशीत मी
विनते प्रेमाची वीण
नाते अपुले जपू
आनंदी प्रेमभराने
सर्वस्व तुच माझें
सख्या जीवभराचे
सुनंदा किरसान
अर्जुनी मोर गोंदिया
=======
0
4
8
2
9
0



