“ITI कामठीचे प्रशिक्षणार्थी दरवर्षी टॉपर ” यंदाही यशाची उज्ज्वल परपंरा कायम
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
“ITI कामठीचे प्रशिक्षणार्थी दरवर्षी टॉपर ” यंदाही यशाची उज्ज्वल परपंरा कायम
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: कामठी आय.टी.आय.चे शिल्प निदेशक श्री. अनिल जिभकाटे प्रशिक्षणार्थ्यांनी डि.जी.ई.टी.तर्फे झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत वेल्डर ट्रेड मध्ये दरवर्षी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकविला. सत्र: 2020-21 मध्ये शशांक लांबट 93.14% गुण घेऊन महाराष्ट्रातून प्रथम आला. सत्र: 2021-22 मध्ये कु.नितु प्रकाश मेश्राम 96.50% गुण घेऊन मुलींमधुन देशात दुसरी आली. सत्र:2022-23 मध्ये समीर श्रीरामे 94% गुण घेऊन महाराष्ट्रातून प्रथम आला. कोव्हीड मध्ये ” ऑपरेशन अँन्ड मेंटेनन्स आफ पि.एस.ए.ऑक्सिजन प्लांट” या कोर्स मध्ये देशात प्रथम आली.
कु.नितुताई विजय गडपायले औद्योगिक कारखान्यात वेल्डर ट्रेडच्या कुशल प्रशिक्षणार्थींना मोठी मागणी आहे. त्यासाठी अनिल जिभकाटे यांनी ओ.जे.टी करीता प्रशिक्षणार्थींना तेलंगणा राज्यातील नंदीगामा येथे पाठविले. मेधा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे चालविण्यात येणारी सेंटर ऑफ एक्सलन्स वेल्डींग इंस्टीट्यूट मध्ये एकूण 10 प्रशिक्षणार्थींना कुठलेही शुल्क न घेता मोफत प्रशिक्षण दिले व येण्याजाण्याच्या खर्चासह ,राहणे व खाणे याची उत्तम व्यवस्था करून दिली.या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे मिग वेल्डींग चे वेल्डर क्वालिफिकेशन ( WPS व PQR ) मुंबई येथील इंस्टिट्यूट ऑफ वेल्डिंग इंस्पेक्शन अँन्ड टेस्टिंग टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेतर्फे झाले.
त्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना नागपूर येथील नामांकित कंपनी अभिनव इंजिनिअरिंग वर्क्स, हिंगणा औद्योगिक क्षेत्र मध्ये शिकाऊ उमेदवारी भरती योजना अंतर्गत अप्रेंटिस मिळवून दिली. सध्या अनिल जिभकाटे हे नियमित ट्रान्सफर होऊन नागपूर येथील सर्वात मोठी संस्था, संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रद्धानंदपेठ नागपूर येथे कार्यरत आहेत.विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रोजेक्ट संस्थेत राबवत आहेत. सोबतच वेल्डर ट्रेड चे प्रशिक्षण व ट्रेनिंग प्लेसमेंट चे कार्य करित आहेत.आपल्या नऊ महिण्याच्या कार्यकाळात जवळपास 28 विविध कंपनीचे कॅम्पस मुलाखत आयोजित करण्यात पुढाकार घेतला.
परिक्षा होण्याच्या अगोदरच संस्थेतील नियमित प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना अप्रेंटिस मध्ये काम करण्यासाठी संधी मिळाली. माजी प्रशिक्षणार्थींना विविध कंपनी कंपनीतर्फे रोजगार मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत.एवढ्यावरच न थांबता आदिवासी भागातील प्रशिक्षणार्थींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी नागभीड, ब्रम्हपुरी, देसाईगंज, लाखांदुर,आरमोरी ,कोरचि ,गडचिरोली, मुल ,सिंदेवाही येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नागपूर येथील नामांकित कंपनी पेब 360° SOLUTIONS च्या एच.आर.अधिकारींना सोबत नेऊन कॅम्पस मुलाखत आयोजित करण्यात आली.
याद्वारे जवळपास 250 आय.टी आय.च्या प्रशिक्षणार्थींना रोजगाराची संधी मिळणार आहे. आतापर्यंत अनेक प्रशिक्षणार्थींना अप्रेंटिस व रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. पुणे येथील वेल्डिंगच्या क्षेत्रात जगात प्रसिद्ध असलेल्या फ्रोनिअस कंपनीचे ऍडव्हान्स वेल्डिंग कोर्स चे मोफत स्पॉन्सरशिप कामठी, भंडारा, पवनी आय.टि.आय.च्या सहा प्रशिक्षणार्थीना मिळवून दिली. पुढील आगष्ट महिण्यात अहमदाबाद येथे “टाटा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्किल ” या संस्थेत होणारे रोबोटिक वेल्डिंग प्रशिक्षणात जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर येथील प्रशिक्षणार्थीनी कु.प्रियंका डोंगरे सहभागी होणार आहे. याकामी लागणारा प्राथमिक खर्च अनिल जिभकाटे यांनी केला आहे. ऐवढ्यावरच न थांबता अभिनव इंजिनिअरिंग वर्क्स, हिंगणा MIDC कडून कंपनीच्या सि. एस. आर. फंडातून संस्थेला टिग वेल्डिंग मशीन मिळवून घेतली. त्यांनी जवळपास आय.टि.आय.च्या सहा पुस्तके लिहून राज प्रकाशनातर्फे प्रकाशित केलेल्या आहेत.
स्वतः तयार केलेले ऑनलाईन 991 व्हिडिओ राज एज्युकेशन युट्यूब आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे महास्किल युट्युब चॅनेल चे वेल्डर व्यवसायातील प्रमुख म्हणून कार्य करत आहेत. उद्यम लर्निंग, पि.एस.ए.ऑक्सिजन प्लांट, ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट काउंसिल चे मास्टर ट्रेनर म्हणून कार्य करत आहेत. समाजाला व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अनिल जिभकाटे सारख्या मार्गदर्शन करणारे शिल्प निदेशक हवेत.



