Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

दिलेल्या त्या जखमा

सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर, नागपूर

0 4 8 2 2 3

दिलेल्या त्या जखमा

अजून आहे ओल्या, दिलेल्या त्या जखमा.
नकोस मीठ चोळू,सहवेना वेदना…धृ

विसरत चाललो,भावनिक संबंध…
उरला नाही काही,संबंधाचा सुगंध…
दुरावलेल्या स्थिती,कोण देती सांत्वना?
नकोस मीठ चोळू,सहवेना वेदना.

लावला अतोनात, जीव तुझ्याच जीवा
नाही प्रकाशला तो,काळोखातला दिवा
नाही प्रालब्धात ही,उजाळली हो समा.
नकोस मीठ चोळू,सहवेना वेदना.

उरली नाही आशा,झाली आशा निराशा
प्रितीची उरली ना,नित्यची गोड भाषा
जगण्यातला अर्थ, झाला मातीत जमा
नकोस मीठ चोळू,सहवेना वेदना.

प्रेमाचा भिकारी हा, करतो विनवणी
नाही प्रालब्धाचीही, उजाळली पर्वणी
“सुधाकरा” प्रकाश,उजेडेना अंगणा
नकोस मीठ चोळू,सहवेना वेदना.

सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 2 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे