Breaking
ई-पेपरकवितानागपूरमहाराष्ट्र

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 7 3 3 1

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सहा🎗🎗🎗*

*☄विषय : लढाई संपली नाही☄*
*🍂शनिवार : २५ / जुलै /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*लढाई संपली नाही*

हक्क दिधले बाबा भीमाने
संविधान तुम्ही वाचवारे!
जर मनुवादी आडवे आले
पायाखाली तुडवित चलारे !!ध्रु!!

न्यायासाठी संघर्ष करावे
सदा अन्यायी दूर लोटावे !
लढाई संपली नाही तरी
अरे लढता लढता मरावे!!
निर्धार जिंकण्याचा मनी
तो नसानसात बाळगारे!!१!!

आठवून प्रताप भीमाचा
साहील्या वेदना जीवाला !
अन भ्रष्टाचारी होऊन तुरे
भीक मागतो समाजाला !!
हाती घेऊन पेटती मशाल
उजेड अंधारी दाखवारे!!२!!

युवाशक्ती जगात देशाची
वैभव ताकत नि सम्रुध्दी !
गहाण कोणीही राहू नये
शाबूत ठेवा सन्मान बुध्दी !!
गोवर्धन सांगे बहूजनाला
लोकशाही वारस व्हारे!!३!!

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा,जि, यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*लढाई संपली नाही*

विद्यार्थ्यांनी मागण्या अपुल्या
धरल्या अगदी रेटून खेटून.
सत्ताधाऱ्यांचा गर्व पुरता
गेला पार धुळीत मिटून..

लोकशाहीपुढे शेवटी
झुकली ती हुकूमशाही
प्रधानाचा राजीनामा
याचीच देते आज ग्वाही

आज जरी जीत झाली
अजून लढाई संपली नाही
भ्रष्टाचारी गिधाड – गेचूळ
पसरलेत दिशास दाही

जडे- मुळे त्यांची आता
कापावे लागतील मुळासकट
खऱ्या अर्थाने लोकशाही
तेव्हाच होईल धीट- धाकट

न्यायात उचललेले पाऊल
फिरवू नका माघारी आता
लढत रहा न्याय हक्कासाठी
संविधानाशी जोडून नाता

*सौ वनिता गभणे*
*आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*लढाई संपली नाही*

पेपरफूटीचे प्रकरण
आले चव्हाटय़ावर
विद्यार्थ्यांचा असंतोष
आला रस्त्यावर

पेपर फुटतात कसे
ओरडतात विद्यार्थी
वर्षभर केली मेहनत
सारं गेलं व्यर्थी

तरुणाईचा झाला आक्रोश
रस्त्यावर उतरलेत
सरकार विरोधी
घोषणा देऊ लागलेत

पेपरफुटी विरोधात
झाली लढाई सुरू
तरुणाईने फुंकले बंड
संघर्ष लागला स्फुरू

राजीनामा द्यावा शिक्षणमंत्र्यांनी
प्रमुख मागण्या असे काही
लढा आमचा राहील सुरू
अजून लढाई संपली नाही

*श्री.पुरुषोत्तम वि.ठोंबरे*
*बंधुनगर,झिंगाबाई टाकळी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
लढाई संपली नाही*

*नका ठेवू शस्त्र खाली*
*अजून लढाई संपली नाही*
*नजरेस दिसती साधे भोळे*
*मुळात आहेत ते कसाई*

*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक,=*
*ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*लढाई संपली नाही*

लढाई संपली नाही विद्यार्थ्यांची
अजून खुप काही बाकी आहे
काही मागण्या मान्य केल्या जरी
अपेक्षीत मागणी तर बाकी आहे

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*लढाई संपली नाही*

लढाई संपली नाही
‎ जरी मागण्या झाल्या पूर्ण काही
‎ पंख छाटण्या नवीन मार्ग
‎ व्यवस्था नेहमीच शोधत राही

*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 3 3 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे