Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

स्वामी विवेकानंद

कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, नागपूर

0 4 8 2 9 3

स्वामी विवेकानंद

आपला देश एकदा समजून घ्यावा म्हणून स्वामी विवेकानंद यांनी हिमलयातासून ते कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले.त्याचा जन्म 12 जानेवारी 1863 ला कोलकत्ता येथे झाला.ते एक महान संत व नेता होते. लहानपणी चे नाव नरेंद्रनाथ दत्त लहानपणापासून त्यांची बुध्दी प्रखर व तेज होती.तरुणाचे ते प्रेरणास्रोत असल्यामुळे त्याचा जन्म दिवस युवादिन म्हणून साजरा केला जातो. अध्यात्मिक गुरु रामकृष्ण परमहंस यांना प्रथम भेटीतच विचारल्यावर ” तुम्ही देवाला बघितल्यं का? ” परमहंस म्हणालेत ” हो मी बघितल्यं ” गुरु आणि शिष्याची सुरुवात इथुनच झाली. ते आपल्या गुरु पासुन प्रेरीत होते.गुरु कडून ते हे शिकलेत की जगात देवाचे अस्तित्व आहे. नेहमी दुसर्‍याची मदत करावी.परमहंसच्या मृत्युनंतर मठाची जबाबदारी स्वामी विवेकानंद यांच्यावर आली. ते मठातील नवीन तसेच जुन्या शिष्यांना ज्ञानार्जन करीत.

1893 मध्ये अमेरिकन पार्लमेटला प्राचीन भारतीय संस्कृती या विषयावर तिथे भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्याकरीता जाणार होते.आपल्या भाषणाची सुरुवात ” सिस्टर अन्ड ब्रदर ऑफ अमेरिका ” या शब्दांनी त्यांनी सुरुवात केली नेहमी प्रमाणे ” लेडीज अन्ड जॅन्टलमन ” ऐकण्याची सवय असणाऱ्यांना जेव्हा स्वामी विवेकानंदच्या शब्दाची सुरुवात ऐकुण तेथील लोकांना खुपच वेगळे आणि भावस्पर्शी वाटले सुरुवातीलाच या वाक्यानी संपूर्ण सभागृहातील प्रेक्षकांनी टाळयाची दाद दिली. पोरबंदरला असताना मोठमोठे इंग्रजी ग्रंथाचे खंड स्वामी विवेकानंद वाचनालयातून आणून वाचीत असत.एक खंड वाचून झाला की दुसर्‍या दिवशी परत करायचे हे बघुन ग्रंथपालनी त्यांच्या शिष्याला विचारले ” स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात वाटतं. एका दिवसामध्ये ऐवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे.” शिष्यांनी स्वामीजीना ही गोष्ट सांगितली.चौथ्या दिवशी स्वामीजी स्वतः खंड घेण्यासाठी गेलेत. स्वामीजी ग्रंथपालाना म्हणालेत ” पहिले तीन खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत, शंका असेल तर तुम्ही त्यातले काहीपण विचारू शकता.” ग्रंथपालाने स्वामीजींना त्या तीन खंडातील आडवे-उभे प्रश्न विचारलेत ते पेज क्रमांकानुसार संपूर्ण सांगू लागलेत. ग्रंथपाल म्हणालेत ” हे सामान्य व्यक्तीचे काम नाही. ” त्यांनी विचारले हे कसे शक्य आहे स्वामीजी म्हणालेत ” मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो, तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे जे मी वाचतो त्यावर माझ मन केंद्रित होते ते लक्षात राहते पाठ होऊन जाते.”

जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीचे दर्शनाकरीता समुद्राच्या काठी होते तेव्हाच त्याचे लक्ष गेले की मध्यभागी एक-दीड फर्लांग अंतरावर दोन शिलाखंड आहेत. ते पाण्याच्या भरपूर वर आहेत आपण तिथे गेले पाहिजेत. नावाडयाला तिथे सोडून देण्यास विचारले असता नावाडी म्हणाला तुम्हाला पाच पैसे मला दयावे लागतील. स्वामीजी म्हणालेत माझ्याकडे काहीच पैसे नाहीत मी संन्यासी आहे. नावाडयांनी नकार देताच स्वामीजीनी एकदम सागरामध्ये उडी मारली. नावाडी घाबरून गेला परत फिरण्यास सांगितले पण ते एकटेच त्या शिलाखंडावर तीन दिवस तीन रात्र काही न खाता ध्यानास्थ बसलेत.भारतमातेचे चिंतन करत होते.डोळ्यासमोर त्यांना भारतातील गोरगरीब जनता.लोक उपाशी आहेत त्यांना जेवायला नाही.आपण त्यांना वेदान्ताचा उपदेश करत असतो. वेदांत सांगणे खोटे आहे.” लोकांची मदत करा त्यांना दोन वेळचे जेवायला द्या हे विवेकानंदानी समजावून सांगितले.

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे