0
4
8
2
9
3
भिजकी वही
संस्कृत,वेदांचा, नव्हताच अधिकार,
प्राकृत भाषेत सांगून, झाले गुन्हेगार..
वेदापेक्षाही श्रेष्ठ, अभंगवाणी ठरली,
शिक्षा देत गाथा, इंद्रयणीत बुडवली..
तुझी भिजकी वही, होता मोठा ग्रंथ,
पडता इंद्रायणीत, पाणी झाले संथ..
वहीतला एकेक अभंग,वाणी झाला,
जनसामान्या मुखी,आपसूक वदला..
भिजकी वहीत अभंग,अभंग राहिले,
तुकोबाचे कार्याचे,मूल्यांकन जाहले..
तत्कालीन ढोंगीपणावर,घातला घाव
अंधश्रद्धा थोतांडा,नव्हता मुळी वाव
भागवत धर्माचा,तुका कळस झाला,
वंदनीय जगतगुरूचा,नाद निनादला..
बी एस गायकवाड
पालम, परभणी
==========
0
4
8
2
9
3



