Breaking
ई-पेपरकविताखानदेशनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

छोटे वारकरी

माधुरी शेवाळे पाटील

0 4 8 2 8 6

छोटे वारकरी

आले नटून थटून
आज छोटे वारकरी
बंडी धोतर डोई टोपी
शेला शोभे भरजरी…१

माझे छोटे वारकरी
टाळ हातात घेऊन
भजनाच्या तालावर
जागी घालती रिंगण…२

चाले रांगेत दिंडीत
दिसे भाळावर टिळा
डोई तुळशी वृंदावन
विठू नामाची ती शाळा..३

दिंडी गावात चालली
मुली नेसल्या लुगडी
नाद मृदुंगाच्या ताली
सारे खेळत फुगडी…४

छोटे छोटे वारकरी
हाती घेऊन पालखी
एक सूर एक ताली
भजन विठ्ठलाचे मुखी…५

माधुरी शेवाळे पाटील
जिल्हा नाशिक

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे