जिल्ह्यातील बेरोजगारांना न्यू ऐरा क्लीनटेक आणि ग्रेटा एनर्जी मार्फत रोजगार निर्मिती
नागपूर शहर प्रतिनिधी

जिल्ह्यातील बेरोजगारांना न्यू ऐरा क्लीनटेक आणि ग्रेटा एनर्जी मार्फत रोजगार निर्मिती
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: (दि १६ मार्च) विदर्भात विपुल खनिज संपत्ती आहे. या संपत्तीचा प्रदूषणमुक्त वापर कसा करावा याचे नियोजन करूनच भद्रावती परिसरात दोन ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येत आहे. भद्रावती येथील न्यू ऐरा क्लीनटेक प्रा.लि. आणि ग्रेटा एनर्जी प्रा.लि. च्या एकात्मिक ग्रीन स्टील प्रोजेक्ट चे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय खाण आणि खनिकर्म मंत्री किशनजी रेड्डी यांच्या हस्ते पार पडले.
विशेष अतिथी अशोकजी उईके (पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री म.रा.), आशिषजी जयस्वाल (नियोजन व वित्त मंत्री) खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार किशोरजी जोरगेवार,आमदार देवराजी भोंगळे , हंसराज अहिरजी (माजी गृहमंत्री ) डब्ल्यूसी चे सीएमडी श्री पांडे जी उपस्थित होते…
न्यू ऐरा क्लीनटेक कंपनीचे संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब दराडे यांच्या कडून डॉ आशिष कोरेटी (संचालक-वजह फाउंडेशन) याना गडचिरोलीच्या प्रतिनिधीत्वासाठी विशेष आमंत्रित केले होते. त्याप्रसंगी,उभारल्या जाणाऱ्या कोल गॅसिफिकेशन च्या सात प्रकल्पांपैकी चार प्रकल्प विदर्भात येत असल्यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळण्यासोबतच गडचिरोली , चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार सुद्धा मिळणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगाराच्या संधीसाठी मी तत्परतेने काम करणार असल्याचे सुद्धा डॉ आशिष कोरेटी यांनी प्रतिपादन केले. डॉ आशिष कोरेटी यांनी न्यू ऐरा क्लीनटेक आणि ग्रेट एनर्जी प्रा.लि. च्या संस्थापकांना पुढील वाटाचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माधव दराडे, अजय देवते,चेतन कवळते, डॉ प्रशील उईके, लोमेश उसेंडी (सेनी नायब तहसिलदार , अंकुश गाढवे,नीलकंठ गोहाने,सारंग जांभुळे, शिवकुमार भैसारे, शिवकुमार कोकोडे, भगवान सहारे, गणेश मडावी, विलास कोरेटी,स्वप्नील शिंपी आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



