Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनचंद्रपूरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

होकार नकार एकाच नाण्याच्या दोन बाजू….!”; वैशाली अंड्रस्कर

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 3

“होकार नकार एकाच नाण्याच्या दोन बाजू….!”; वैशाली अंड्रस्कर

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

गोमू संगतीने माझ्या तू येशील का ? नाही म्हणता म्हणता शेवटी गोमू नाखवा सोबत ‘आरं तुझ्या संगतीने मी येणार हाय…’, म्हणून होकार देऊन टाकते आणि एकदाचा प्रश्न मिटतो… शाळा महाविद्यालयात पूर्वी कोळीनृत्य म्हटले की, हमखास ‘गोमू संगतीने…’, वाजवले जायचे.

या सर्व गोष्टींचे चर्वितचर्वण करण्याचे कारण म्हणजे, ‘मराठीचे शिलेदार’ समूहात शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेच्या निमित्ताने दिलेला विषय ‘होकार देऊन पहा’. समूहातील रचनांचे अवलोकन केले आणि नजरेस पडले…खरेच किती आळवणी होकारासाठी…! तसंही चंद्र, सूर्य, तारे आणून झालेच आहेत की प्रियतमेसाठी आणि तुझ्या चंद्रमौळी झोपडीतच सुख माझे म्हणत..‌.’दिस जातील, दिस येतील…भोग सरल, सुख येईल’, अशी स्वप्ने रंगवत प्रेयसीचेही तनमनधन अर्पण करणे. कदाचित जगाच्या आरंभापासून अंतापर्यंतचा हा होकार नकाराचा प्रवास निरंतर चालू राहणारा…!

काही शिलेदार जरा वेगळ्या धाटणीच्या आशयाकडे वळले, चांगल्या कामाला होकार देऊन समाधानाची झोप घेण्यासाठी आग्रह करणारी वनिता गभणे असो वा ‘संकटाच्या वादळातही…खंबीर उभा राहा… जीवनाला पुन्हा एकदा, होकार देऊन पाहा…म्हणणाऱ्या सरलाताई टाले असो… छान कलाटणी आशयाला…वर्षा मोटेताईंची पण ‘स्व’ लाच होकार देऊन नवीन क्षितिज उघडण्याची आणि गूढ उलगडण्याची शब्दकिमया अप्रतिमच…रजनी भागवत तर अंतर्मनालाच साद घालतात ‘मिटून घेणे स्वतःला तुलनेने सोप्प असतं, होकार देऊन पाहा जगण्याला जगणं इतकं वाईट नसतं’, खरेच प्रगल्भ लेखणीचे सुंदर दर्शन सर्वांच्या काव्यरचनांमधून….!

‘खरेतर होकार आणि नकार’ हा आयुष्यभर चालणारा खेळ. पण तो स्वीकारण्याचा मनाचा मोठेपणा अंगी असणे गरजेचे. अगदी बालपणापासून मोबाईल शिवाय आमचा बाळ-बाळी जेवणच करीत नाही पासून सुरू झालेला होकाराचा प्रवास….सहावी-सातवीतील कुमारवयीन मुला-मुलींनी पालकांनी मोबाईल घेऊन नाही दिला म्हणून आत्महत्या केलेल्या बातम्या वाचून मन सुन्न होते. होकारासोबतच नकार पचविण्याची क्षमता म्हणजे मानवी मन मेंदूचा विकास…ती क्षमता वाढवणे हेच आजच्या पालकांपुढे खरे आव्हान….कारण होकार नकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू….खरंय ना….?

सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह

3.7/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे