Breaking
परीक्षण लेखमराठवाडासाहित्यगंध

कर्म कसे असावे ?

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर

0 4 8 3 0 0

कर्म कसे असावे ?

कर्म करत असताना फळाची अपेक्षा ठेवू नये.कर्म करयाचे आपल्या हातात आहे.फळ द्यायच आपल्या हातात नाही. कर्म करताना प्रमाणिक करणे हे फक्त आपल्या हातात आहे. देव कधीच नशीब लिहित नाही, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपला व्यवहार, आपली कर्मच आपले नशीब लिहितात. नीती योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसते. समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हिच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे. दु:ख भोगणारी व्यक्ती, आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल, पण,’दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही’.

माणुसकी मनात असते, परिस्थिती मध्ये नाही. परमेश्वर मात्र कर्मच पाहतो, मृत्यू पहात नाही.तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल, पण सरळ व्यक्ती सोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुले करते. जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळते आणि नाते संबंधातील प्रेम गेल्या नंतर माणूस अंतर मनात जळतो. जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर, कुणीही कुणाची वाट बघत नाही.

जे पाहिजे ते मिळवूनच थांबायचे, ही कदाचित सफल माणसाची निशाणी असेल, पण जे मिळाले ते हसतमुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे. ईश्वर जेव्हा देतो तेव्हा चांगलेच देतो आणि देत नाही, तेव्हा अधिक चांगले मिळवण्याचा मार्ग दाखवतो. पण जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो तेव्हा तो सर्वात उत्तम, सर्वोत्तम फळच… देतो. हे चरण फक्त मंदिरा पर्यंतच घेऊन जाऊ शकतात. आचरण तर परमात्म्या पर्यंत घेऊन जाते. चांगल्या कर्माचे चांगले, तर वाईट कर्माचे वाईट फळ मिळते; परंतु कर्माचे फळ तर मिळणारच. कर्म-फळ-संबंध नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ज्या प्रकारे भौतिक जग कार्यकारणभावाने बांधले गेले आहे त्याच प्रकारे नैतिक जगत कर्म-फल-संबंधाने बांधले गेले आहे. यालाच कर्मवादाचा सिद्धांत किंवा कर्मगती, असे म्हटले जाते.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा,जिल्हा धाराशिव
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे