0
4
8
2
9
0
कंदिलशून्य
पावसा पाण्याच्या दिवसात
घरातली विज,होते गुल,
विजेरी आणि चार्जिंगसुद्धा
करते, कधी कधी दिशाभूल.
चमचम झगमगते
आज,श्रीमंताचे घर,
चोवीस तास वापरी
महागडे इनव्हरटर.
कंदिलशून्य या,जगात
अधिराज्य,माजले अंधाराचे,
केरोसीन झाले गायब
भाव वाढले,डिझेल पेट्रोलचे.
देव घरातील दिवा
भक्तीचा उजेड देई,
अध्यात्माचा प्रकाश
जगण्यास गती देई.
अडगळीतला कंदिल
चकाचक पुसून घेऊ,
अंतःकरणातील दिप
सदैव प्रज्वलीत ठेवू.
मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत परभणी
==========
0
4
8
2
9
0



