Breaking
कृषीवार्ताकोकणमहाराष्ट्रमुंबई

रायगडमध्ये युरिआ खताचा तुटवडा, शेतक-यांमध्ये संताप.

प्रदेश कॉंग्रेस सेक्रेटरी अॅड.प्रविण ठाकूर यांचे शासनाला व आर.सी.एफ.ला तातडीने पत्र.

0 4 8 2 9 3

रायगडमध्ये युरिआ खताचा तुटवडा, शेतक-यांमध्ये संताप.

प्रदेश कॉंग्रेस सेक्रेटरी अॅड.प्रविण ठाकूर यांचे शासनाला व आर.सी.एफ.ला तातडीने पत्र.

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग – रायगड जिल्हयात सध्या युरिआ खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन शेतीच्या हंगामामध्ये शेतक-यांना कराव्या लागणा-या या अडचणीबाबत प्रदेश कॉंग्रेस सेक्रेटरी अॅड.प्रविण ठाकूर यांनी शासनाला व आर.सी.एफ.ला तातडीने पत्र लिहून या परिस्थितीमधून तात्काळ मार्ग काढण्याची मागणी केली आहे.

मागील काही महिन्यांपासून या परिस्थीतीचा सामना करणा-या शेतक-यांकडून त्याचा तीव्र्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान रायगड जिल्हयातील सर्वच तालुक्यांमध्ये हा प्रत्यय येत आहे. जिल्हा कृषि विभागासोबतच आर.सी.एफ.कंपनीची उदासिनता टीकेचा विषय बनला आहे.

रायगड जिल्हयात मागील खरिपातील भात पिकाचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. मात्र जिल्हयात मागील काही दिवसांपासून खत विक्रेत्यांकडे युरिआ खताचा साठा उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधवांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. रायगड जिल्हा राज्यात भाताचे कोठार म्हणून ओळखळा जातो. सध्या शेतीची कामे जोरात सुरू आहेत. मा. ऐन हंगामात शेतक-यांना खताच्या तुटवडयाचा सामना करावा लागत आहे.

तरी याबाबत आपण सविस्तर आढावा घेवून युरिआ खताच्या तुटवडयामुळे शेतक-यांच्या होणा-या नुकसानी बाबत मार्ग काढावा अशी विनंती प्रदेश कॉंग्रेस सेक्रेटरी अॅड.प्रविण ठाकूर यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे