
0
5
6
8
0
0
आयुष्याला द्यावे उत्तर
आयुष्याला द्यावे उत्तर
शब्दांनी नव्हे कर्मांनी
स्वप्नांच्या त्या उंच शिखरावर
चढावे धैर्याच्या पावलांनी
अडथळे येतील वाटेमध्ये
वादळेही घोंघावतील
विश्वासाच्या दीपज्योतीने
अंधार सारा विरून जाईल
घामाच्या प्रत्येक थेंबातून
यशाचे मोती जन्म घेतील
हार मानणाऱ्या मनाला
जिद्दीची नवी दिशा मिळेल
दु:ख जरी सोबतीला आले
हास्य ओठांवर फुलू द्यावे
जखमांनाही कवटाळून
नव्या उमेदीने जगून घ्यावे
आयुष्य विचारेल कधीतरी
काय कमावले या प्रवासात
तेव्हा अभिमानाने म्हणावे
माणुसकी जपली प्रत्येक श्वासात
प्रांजली जोशी
विरार, जि.पालघर
0
5
6
8
0
0


